लातूर - सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती, वाढता कर्जाचा डोंगर यामुळे मनोबल खचलेल्या शेतकऱ्यांने विष घेऊन आत्महत्या केली. लातूर जिल्ह्यातील कवठाळा गावात ही घटना घडली. अशोक रामचंद्र हुडे (वय ४८) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.
अशोक हुडे यांना पाच एकर शेती आहे. हुडे यांच्यावर लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि अलाहाबाद बँकेचे कर्ज होते. मागील पाच वर्षांपासून सततची नापिकी, नैसर्गिक आपत्तीमुळे कर्जाचा डोंगर वाढतच गेला. कर्ज फेडायचे कसे? या विवंचनेतून हुडे यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले.
हेही वाचा - भाजपचे कार्यकर्ते आंदोलनासाठी एकवटले अन् चहा-पान करून परतले
विष घेतल्यानंतर त्यांना उपचारासाठी उदगीर येथील रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कवठाळा येथे शनिवारी हुडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत देवणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
त्याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. अशोक हुडे यांच्या कुटुंबियांना तातडीने शासनाने मदत करावी, अशी मागणी कवठाळा गावातील शेतकरी करत आहेत.