ETV Bharat / state

Extramarital Affair : पतीच्या खुनाची तीस हजारात सुपारी, प्रियकराच्या मदतीने आवळला गळा

author img

By

Published : Nov 3, 2022, 1:52 PM IST

मामाच्या मुलासोबत सुरू असलेल्या अनैतिक संबंधात ( extramarital affair with uncle son ) अडसर ठरणा-या पतीचा 30 हजाराची सुपारी देत प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे घडली. याप्रकरणी किल्लारी पोलिसांनी आरोपी पत्नीसह प्रियकराला अटक केली. अन्य दोन आरोपी अद्याप फरार ( extramarital affair ) आहेत.

Extramarital Affair
प्रियकराच्या मदतीने आवळला गळा

किल्लारी ( लातूर ) : मामाच्या मुलासोबत सुरू असलेल्या अनैतिक संबंधात ( extramarital affair with uncle son ) अडसर ठरणा-या पतीचा 30 हजाराची सुपारी देत प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे घडली. याप्रकरणी किल्लारी पोलिसांनी आरोपी पत्नीसह प्रियकराला अटक केली. अन्य दोन आरोपी अद्याप फरार ( Extramarital Affair ) आहेत.

खून करण्याची सुपारी : मागील आठ वर्षापूर्वी औसा तालूक्यातील मौजे उत्का येथील कमलचे तपसे चिंचोली येथील कुमार बलसुरे यांच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांना दोन मुले झाली. सुखी संसार सुरू असताना कमलचे लामजना येथील रहिवासी तिच्या मामाचा मुलगा विष्णू शंकर लांडगे (वय 23) याच्याशी अनैतिक संबंध सुरू झाले. पती त्यात अडसर ठरू लागला. त्यामुळे मयत कुमारची पत्नी कमलने लामजना येथील विजय उर्फ शेरु साहेबराव गवळी व योगेश बळी कांबळे या दोघांना केवळ 30 हजार रुपयांत कुमारचा खून करण्याची सुपारी दिली.

10 हजार रुपये ॲडव्हान्स : यातील 10 हजार रुपये ॲडव्हान्स तर बाकीची रक्कम खून झाल्यानंतर देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे मंगळवारी ( दि.1 नोव्हेंबर ) रात्री साडेनऊच्या सुमारास या दोघांनी मयत कुमारला गाडीवर बसवून बाहेर घेऊन गेले. मयत कुमार हा भोळसर स्वभावाचा असल्याने त्याला आरोपींच्या कटाचा कसलाही संशय आला नाही. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आरोपींनी सुरवातीला त्याच्या तोंडावर मारले व नंतर त्याच्या छातीवर बसून गळा आवळला. कुमार मयत झाल्याची खात्री होताच त्याचा मृतदेह गाढवेवाडी ते नागरसोगा जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या शिवदर्शन गाडवे यांच्या शेतात फेकण्यात ( Murder of husband with lover ) आला.

पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा : बुधवारी ( दि.02 नोव्हेंबर ) सकाळी मृतदेह सापडल्याची बातमी औसा तालूक्यात वाऱ्यासारखी पसरली. स्थानिक नागरिकांनी किल्लारी पोलीसांना याची माहिती दिली. पोलिसांनी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. मयत कुमार बलसुरे हा तपसे चिंचोली येथील रहिवासी असल्याची खात्री पटली. मयताच्या गळ्यावर, तोंडावर मार असल्याने पोलीसांनी हा खूनच असल्याचे समजत तपास सुरु केला. घटनास्थळावरील मृतदेहाच्या अंगावरील खुणा पाहून पोलीसांनी मयताची पत्नी कमलला ताब्यात घेऊन चौकशी केली. तिने तिचा प्रियकर मामाचा मुलगा विष्णू शंकर लांडगे याच्या मदतीने अन्य दोघांना 30 हजारात सुपारी देवून कुमारचा खून केल्याची कबुली ( Accused wife arrest along with boyfriend ) दिली.

किल्लारी पोलिसांत गुन्हा : या प्रकरणी भागवत बळीराम बलसुरे ( वय 38 ) यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन गुरनं 233/2022 कलम 302,120(ब),34 भादवि अन्वये किल्लारी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. मृताची पत्नी कमल बलसुरे व तिचा प्रियकर विष्णू लांडगे या दोघांना अटक करण्यात आली. विजय गवळी व योगेश कांबळे हे दोन आरोपी मात्र अद्याप फरार असल्याचे किल्लारी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.