लातूर - अहमदपूर तालुक्यातील देवकरा येथे विहीर खोदण्याकरिता आणलेल्या जेसीबीमध्ये स्फोट झाला. ही घटना काल रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. शेतकरी प्रभाकर विनायक मुरकुटे यांच्या शेतात विहीर खोदण्याकरीता हा जेसीबी आला होता. या घटनेत दोघांचा मृत्यू, तर एक व्यक्ती जखमी झाला आहे.
हेही वाचा - लिंबाळवाडीत 'लॉकडाऊन', सलग तिसऱ्या दिवशी 63 कोरोनारुग्ण
मौजे देवकरा येथे शेतातील विहीर खोद कामासाठी जात असताना जेसीबीमध्ये अचानक स्फोट झाला. यात शेतकरी प्रभाकर विनायक मुरकुटे (वय 63), दहीफळे बाबुराव पांडूरंग दहीफळे (वय 68 रा.कोळवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर जेसीबी ऑपरेटर भगतराज नारायण सारेआम (रा.चिलखा, मध्य प्रदेश) हे गंभीर जखमी झाले.
जखमीला अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. श्रीकृष्णा प्रभाकर मुरकुटे (वय 38) या शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून किनगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पो.हे.का. तोपरपे हे करीत आहे.
हेही वाचा - मुंबईतील बूट पॉलिश कामगारांना बसतोय कोरोनाचा फटका