ETV Bharat / state

दुष्काळी झळा : 'सोनं' पिकणाऱ्या जमिनीत शेतकऱ्याच्या स्वप्नाची 'माती'; वाचा स्पेशल रिपोर्ट

मांजरा नदीकाठी असलेल्या हरंगूळ (खु) गावच्या शिवाराची 'ग्रीन बेल्ट' म्हणून ओळख आहे. अनेक वर्षापासून या परिसरातील शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत नगदी पिके घेतात. मात्र, मागील ३ वर्षापासून या परिसरात कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हंगामी पिकेही शेतकऱ्यांच्या पदरी पडत नसल्याचे चित्र आहे.

author img

By

Published : Jun 12, 2019, 7:12 AM IST

प्रभाकर पवार

लातूर - मांजरा नदीकाठी असलेल्या हरंगूळ (खु) गावच्या शिवाराची 'ग्रीन बेल्ट' म्हणून ओळख आहे. अनेक वर्षापासून या परिसरातील शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत नगदी पिके घेतात. मात्र, मागील ३ वर्षापासून या परिसरात कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हंगामी पिकेही शेतकऱ्यांच्या पदरी पडत नसल्याचे चित्र आहे. या कारणाने सालगड्याचे पैसे आणि नातवंडांची लग्ने शेतकऱ्याला कर्ज काढून करण्याची वेळ आली आहे.

अशाच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याची समस्या जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी राजेंद्र खराडे यांनी.. पाहूयात ईटीव्ही भारतने घेतलेला विशेष आढावा....

दुष्काळी झळा : 'सोनं' पिकणाऱ्या जमिनीत शेतकऱ्याच्या स्वप्नाची 'माती' पहा स्पेशल रिपोर्ट...

हरंगूळ गावचे प्रभाकर पवार हे वयाच्या 20 व्या वर्षापासून काळ्या आईची सेवा करत आहेत. शेती व्यवसायाबाबतचे ते चालते-फिरते विद्यापीठ असून पंचक्रशतील शेतकरी पिकाबाबतचा सल्ला घेण्यासाठी त्यांच्या बांधावर येतात. मात्र, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवर पर्याय काढण्यात सल्ला देणारे पवारच असमर्थ ठरत आहेत. त्यांना 25 एकर जमीन आहे. या जमिनीत त्यांनी एकरी 100 टन ऊस काढले आहे.

आता वयाची पंचाहत्तरी ओलांडली असतानाही प्रभाकर पवार यांचे परिश्रम आणि पीकपद्धती यामुळे प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचा अनेक कार्यक्रमामध्ये गौरवही झाला आहे. केवळ जमिनीच दर्जेदार असून उपयोग नाहीतर त्याला पाण्याची जोड असणे आवश्यक आहे. पाणीटंचाई लक्षात घेता पवार यांनी 105 फूट खोल विहिरीत आडवे 4 बोअर तसेच शेतालगत असलेल्या ओढ्याजवळ 2 बोअर घेतले. पाणी लागले मात्र तेही अत्यल्प. त्यामुळे त्यांची पाण्याअभावी आता शेती धोक्यात आली आहे.

भर उन्हाळ्यात 10 एकर जोपासला जाणारा ऊसाचे क्षेत्र आता उजाड माळरानाप्रमाणे दिसत आहे. एवढेच नाहीतर पाणीटंचाईमुळे त्यांनी जनावरेही विकली असून सध्या जनावरांची तहान भागवण्यासाठी त्यांना इतरांच्या शेतावर जावे लागत आहे. ज्या शेतीवर त्यांनी 5 एकर जमीन विकत घेतली तीच जमीन आता कर्ज फेडण्यासाठी विकण्याची नामुष्की आल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

त्यांची आपल्या असलेल्या 25 एकराचे क्षेत्र जोपासण्यासाठी 3 सालगडी ठेवलेले होते. मात्र, आता ही संख्या दोनवर आली असून त्याचा पगारही कर्ज काढून दिला आहे. सद्य स्थितीमध्ये त्यांच्यावर महाराष्ट्र बँकेचे 4 लाखाचे कर्ज असून ते फेडायचे कसे हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. सध्या खरीपपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, यंदाही पावसाचे प्रमाण कमी राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे पेरणी होती की नाही याची चिंता पवार यांना लागली आहे.

नातवाने शेती सोडून थाटला दुसरा व्यवसाय -
आजोबाचे वाढते वय पाहता अजित पवार या नातवानेही शिक्षण पूर्ण होताच शेतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली होती. नातवाचा आधार मिळाला तरी प्रभाकर पवार यांनी शेती व्यवसायाकडचे लक्ष सुतभरही कमी केले नाही. मात्र, सततची नापिकी आणि पदरी पडत असलेली निराशा पाहता अजित पवार याने गावातच इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान थाटले आहे.

मागील 50 वर्षापासून प्रभाकर पवार यांनी मातीशी नाळ जोडली गेली आहे. यामुळे सकाळचे 10 वाजले की पवारांची पाऊल आपोआप शेतीच्या दिशेने वळतात. दरम्यान, पवारांसारखे लाखो शेतकरी निसर्गाची साथ मिळण्याची अपेक्षेत आहेत. यंदा तरी वरुण राजा बरसणार का हे पाहावे लागेल.

Intro:बाईट : प्रभाकर पवार (शेतकरी)
अजित पवार (शेतकऱ्याचा नातू)
भागवत हिंगे (सालगडी)
दुष्काळी झळा : 'सोनं' पिकणाऱ्या जमिनीत शेतकऱ्याच्या स्वप्नाची 'माती'
लातूर : मांजरा नदीकाठी असलेल्या या हरंगूळ (खु) गावच्या शिवाराची ओळख ही ग्रीन बेल्ट म्हणून आहे. पारंपरिक पिकांना या शिवारात स्थराच नाही. ऊसाने हिरवेगार असणारे हे क्षेत्र आता उजाड माळरान झाले आहे. मात्र, गेल्या 3 वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे हंगामी पिकेही पदरी पडत नसल्याने सालगड्याचे पैसे आणि नातवंडांची लग्ने ही कर्जकाढुन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यापैकीच प्रभाकर पवार हे शेतकरी... त्यांच्याकडे सर्वकाही असून पाण्याविना होत्याचे नव्हते कसे झाले याबाबत ईटीव्ही भारतने घेतलेला हा आढावा....

Body:प्रभाकर पवार हे वयाच्या 20 व्या वर्षापासून काळ्या आईची सेवा करीत आहेत.. शेती व्यवसायबाबतचे ते चालते- फिरते विद्यापीठ असून पंचक्रशतील शेतकरी पिकाबाबतचा सल्ला घेण्यासाठी त्यांच्या बांधावर येतात... मात्र, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवर पर्याय काढण्यात पवारच असमर्थ ठरत आहेत. 25 एक्कर ती ही काळीभोर जमीन असून आतापर्यंत त्यांनी केवळ ऊस उत्पादनावर भर दिला होता... एकरी 100 टन ऊस काढण्याचे कसब त्यांनी दाखवून दिले होते. वयाची पंचाहत्तरी ओलांडली असतानाही प्रभाकर पवार यांचे परिश्रम आणि पीकपद्धती यामुळे प्रगतशील शेतकरी म्हणून अनेक कार्यक्रमामध्ये गौरवही झाला आहे. केवळ जमिनीच दर्जेदार असून उपयोग नाहीतर त्याला पाण्याची जोड असणे आवश्यक आहे. पाणीटंचाई लक्षात घेता पवार यांनी 105 फूट खोल विहिरीत आडवे चार बोर तसेच शेतलगत असलेल्या ओढ्याजवळ दोन बोर मात्र पाणीच नशिबात नसल्याने आता हीच शेती धोक्यात आली आहे. भर उन्हाळ्यात 10 एक्कर जोपासला जाणारा ऊसाचे क्षेत्र आता उजाड मळरानाप्रमाणे आहे. एवढेच नाहीतर पाणीटंचाईमुळे त्यांनी जनावरेही विकली असून सध्या जनावरांची तहान भागवण्यासाठी त्यांना इतरांच्या शेतावर जावे लागत आहे. ज्या शेतीवर त्यांनी 5 एक्कर जमीन विकत घेतली तीच जमीन आता कर्ज फेडण्यासाठी विकण्याची नामुष्की आल्याचे त्यांनी बोलून दाखवले. 25 एक्कारचे क्षेत्र जोपासण्यासाठी त्यांच्याकडे तीन सालगडी हे ठरलेलंच परंतु आता हीच संख्या दोनवर आली असून त्यांच्या पगारही कर्ज काढून केल्या आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्र बँकेचे 4 लाखाचे कर्ज असून फेडायचे कसे असा सवाल आहे. सध्या खरीपपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत मात्र, यंदाही पावसाचे प्रमाण कमी राहील असा अंदाज वर्तीवल्याने पेरणी होती की नाही याची चिंता पवारांना लागून राहिली आहे.

Conclusion:नातवाने शेती सोडून थाटला दुसरा व्यवसाय
आजोबाचे वाढते वय पाहता अजित पवार या नातवानेही शिक्षण पूर्ण होताच शेतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली होती. नातवाचा आधार मिळाला तरी प्रभाकर पवार यांनी शेती व्यवसायकडचे लक्ष सुतभरही कमी केले नाही... मात्र, सततची नापिकी आणि पदरी पडत असलेली निराशा पाहता अजित पवार याने गावातच इलेक्ट्रॉनिक्स चे दुकान टाकले आहे. मात्र, 50 वर्षापासून प्रभाकर पवार यांची मातीशी जडलेली नाळ कशी तुटेल... त्यामुळे सकाळी 10 वाजले की पवारांची पावले ही शेतीच्या दिशेने वळतातच... त्यांना आशा आहे यंदातरी वरूनराजाची कृपादृष्टी होण्याची...

background व्हॉइस
हे आहेत हरंगूळ गावचे प्रभाकर पवार....घड्याळाचा काटा 10 वर आला की त्यांची पावले आपोआपच शेताच्या दिशेने वळतात.... बर काही त्यांच्यासाठी नवीन नाही गेल्या 50 वर्षापासूनची त्यांची ही सवयच.... गावच्या शिवारात पवार यांना तब्बल 25 वावर आहे... मग काय उत्पादन वाढीसाठी आणि शेतीच्या मशागतीसाठी पवारांकडे 2 सालगडी हे ठरलेलेच.... ते ही वर्षाकाठी 1 लाख रुपये मोजून... सगळं काही सुरळीत होते... मांजरा पट्ट्यातील या काळ्याभोर जमिनीतून सोनं पिकत होत.... सोनं... मात्र, गेल्या 3 वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे गणितच बिघडले.... उत्पादन तर सोडाच, जमिनीत गाढलेलंही पदरी पडेना.... सालगाड्याच्या पगारी आणि नातवाचे लग्न करण्यासाठी आता त्यांच्यावर 4 लाखाच्या कर्जाचा भार पडला...(प्रभाकर पवार यांचा बाईट)....बरं ह्या संकटावर मात करण्यासाठी पवारांनी काय केले नाही...110 फूट खोल विहीर.... त्यात 4 आडवे बोर.... आणि इतर ठिकाणी 2 बोर... मात्र एवढे करूनही सध्या शिवारात पाण्याचा एक थेंबही नाही..... त्यामुळे उत्पादन तर नाहीच उलट दावणीचे जनावरे पाण्यासाठी दुसऱ्याच्या शेतावर घेऊन जावी लागतात.... आणि विकतचा कडबा दावणीला टाकावा लागतो (मजुराचा बाईट) ....सोनं पिकवणारी जमीन आहे पण पाण्याचे गणित काही पवारांना जमले नाही..... दिवसेंदिवस होणारा घाटा आणि वाढणाऱ्या अडचणी यामुळे शेती करावी का नाही असा प्रश्न आहे....(शेत जमिनीचे विसुलस)....मस 25 एक्कर जमीन हाय पण उत्पादन पदरी पडत नाही.... कष्ट केलेल्याचे चिजच होत नाही तर काय उपयोग....म्हणून प्रभाकरराव यांच्या नातवाने शेतीकडे ढुंकून पाहणेही सोडले आहे..... आणि इलेक्ट्रॉनिक चे दुकान सुरू केले आहे....( नातू अजित पवार बाईट) त्यामुळे उत्तम शेती.... दुय्यम व्यवसाय....आणि कनिष्ठ नौकरी हे फक्त म्हणण्यापूरते मर्यादित राहीले आहे हे नक्की....
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.