ETV Bharat / state

शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण, चौघांना अटक - लातूर जिल्हा लेटेस्ट न्यूज

लातूर येथील स्व.विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान व संशोधन संस्थेच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी धक्काबुक्की केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली आहे. डॉ. अमित नंदलाल वर्मा असे या निवासी डॉक्टरांचे नाव आहे.

शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण
शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण
author img

By

Published : Jun 13, 2021, 7:48 PM IST

लातूर - येथील स्व.विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान व संशोधन संस्थेच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी धक्काबुक्की केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली आहे. डॉ. अमित नंदलाल वर्मा असे या निवासी डॉक्टरांचे नाव आहे.

शहरातील गांधी चौकात स्व.विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान व संशोधन संस्थेचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय आहे. काल रात्री नागनाथ काशीनाथ निलंगेकर (वय 60 वर्ष) यांचे कोरोनाने निधन झाले. यावेळी निवासी डॉ. अमित वर्मा कर्तव्यावर होते. निधनाची माहिती कळताच मृत नागनाथ निलंगेकर यांचे चिरंजीव अमोल निलंगेकर यांचे चार मित्र रुग्णालयातील कोविड वार्डात आले. कर्तव्यावर असलेल्या डॉ. अमित वर्मा यांच्याशी वाद घालत, त्यांनी डॉक्टरांना धक्काबुक्की केली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच गांधी चौक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ एका आरोपीला अटकही केले. परंतु उपस्थित डॉक्टर आक्रमक झाले. त्यांनी अन्य तीन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. हा सर्व प्रकार काल मध्यरात्रीपर्यंत सुरू होता. त्यानंतर अन्य तीन आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शहरातील गांधी चौक पोलीसांनी शुभम दिलीप नाकाडे (रा.व्यंकटेश नगर, लातूर), श्रीनिवास गोविंदराव घोबे (रा.अंबाजोगाई रोड, लातूर), आकाश प्रमोद शेटे (रा.निफाड, नाशिक), नामदेव हणमंत शिंदे (रा.व्यंकटेश नगर, लातूर) यांच्यावर गुर.नं.322/2021 कलम-353,332,504.34 भादवि व महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय हिंसाचार प्रतिबंधक अधिनियम कलम-5 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण

अद्याप रुग्णालयाच्या इमारतीचे हस्तांतर बाकी

स्व.विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान व संशोधन संस्थेने कोविडच्या पार्श्वभूमीवर गांधी चौक येथे सुपरस्पेशालिटी रुग्णालय सुरू केले आहे. येथे शासनाकडून रुग्णांना अत्यावश्यक सेवा पुरवल्या जातात. येथील रुग्णालय सुरू होवून वर्षभराचा कालावधी झाला आहे. सदरील रुग्णालय कोविडसाठी घाईगडबडीत सुरु करण्यात आले. येथील सीसीटीव्ही कॅमेरेही बंद आहेत. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने विचारणा केली असता, शासनाने ही इमारत अद्याप रुग्णालय प्रशासनाकडे हस्तांतरीत केली नसल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा - मंत्री विजय वडेट्टीवार यांची पश्चिम महाराष्ट्रातील निवडक ओबीसी नेत्यांसोबत बैठक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.