ETV Bharat / state

देशमुख Vs निलंगेकर...लातुरचा राजा कोण?

author img

By

Published : Sep 23, 2019, 3:32 PM IST

Updated : Sep 23, 2019, 5:15 PM IST

लातूर लोकसभेची निवडणूक ही पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि आमदार अमित देशमुख यांनी प्रतिष्ठेची केली होती. अमित देशमुख यांनी गतवैभव मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. तर, वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पालकमंत्र्यांनी लक्ष केंद्रित केले होते. जिल्ह्यातील निलंगा, अहमदपूर, उदगीर आणि लातूर शहर या चारही विधानसभा मतदार संघात भाजपने मताधिक्य घेतले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सहाही मतदार संघात भाजपचा झेंडा फडकवणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

देशमुख VRS निलंगेकर...लातुरचा राजा कोण?

लातुर- जिल्ह्याच्या राजकारणात विलासराव देशमुखांचा दबदबा होता. त्यांच्या कार्यकाळात लातुर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. आता त्यांचे पुत्र अमित आणि धीरज यांच्यावर ती धुरा आहे. जिल्ह्यातील काँग्रसचा प्रभाव कमी करण्यात भाजपच्या निलंगेकर पाटलांना यश आले आहे. 2014 च्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचे समसमान म्हणजेच प्रत्येकी 3 आमदार निवडून आले होते.

विलासरावांच्या नावाचं वलय आणि जनसामान्यांच्या मनात असणारा देशमुख घराण्यावरील विश्वास आणि प्रेमाच्या बळावर जिल्ह्यातील काँग्रेस मोदी लाटेनंतरही तग धरून असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. पण काँग्रेसच्या गडाला सुरूंग लावण्यात भाजपला आणि मुख्यत: संभाजी पाटील निलंगेकरांना यश आले, हेही तितकेच खरे. त्यामुळे जिल्ह्याचे राजकारण फक्त भाजप विरूध्द काँग्रेस एवढेच मर्यादीत नसून निलंगेकर विरूध्द देशमुख अशी लढत असणार आहे.

हेही वाचा -२० तास काम करणार, पण राज्य चुकीच्या हातांत जाऊ देणार नाही - पवार

लातूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. भाजपला यात स्पष्ट बहुमत मिळाले होता. काँग्रेसला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले तर राष्ट्रवादी काँग्रेसची पिछेहाट झाली होती. लातूर हा काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला होता. लातूर नगरपालिकेच्या स्थापनेपासून काँग्रेसचे वर्चस्व होते. लातूर म्हटल्यावर विलासराव देशमुख असे समीकरण झाले होते. सर्वाधिक काळ राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या विलासराव देशमुखांना लातूरकरांनी नेहमीच साथ दिली होती. विलासरावांच्या निधनानंतर लातूरचे नेतृत्व त्यांचे पुत्र अमित देशमुख यांच्याकडे आले. लागोपाठ दोन विधानसभा निवडणुकांमध्ये अमित देशमुख विजयी झाले. पण राज्यात भाजपची सत्ता येताच लातूरमधील राजकीय परिस्थीती बदलली. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना लक्ष करत एक एक काँग्रेसकडून हिरावून घेतले. त्यामुळे यंदाची निवडणूक संभाजी पाटील निलंगेकर आणि अमित देशमुख या दोघांसाठीही प्रतिष्ठेची बनली आहे. लातूर लोकसभेची निवडणूकही पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि आमदार अमित देशमुख यांनी प्रतिष्ठेची केली होती. अमित देशमुख यांनी गतवैभव मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. तर, वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पालकमंत्र्यांनी लक्ष केंद्रीत केले होते. जिल्ह्यातील निलंगा, अहमदपूर, उदगीर आणि लातूर शहर या चारही विधानसभा मतदारसंघात भाजपने मताधिक्य घेतले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सहाही मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकवणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

हेही वाचा - हवशे-गवशांचा महापूर..! सिध्दू'अण्णा विरुध्द सचिन'दादा' काँटे की टक्कर?

अमित देशमुख हे लातूर शहरमधून निवडून येत आहेत. गेली 10 वर्ष ते येथून आमदार आहेत. दिवंगत विलासराव देशमुखांचा हा मतदार संघ होता. ते पाच पंतवार्षीक या मतदार संघातून निवडून आले होते. अमित याही वेळेस याच मतदारसंघातून उभे ठाकणार आहेत. मागिल निवडणुकीत ते 49 हजार 465 मतांनी निवडून आले होते. भाजपच्या शैलेष लाहोटींचा त्यांनी पराभव केला होता. याही वेळेस लाहोटी भाजपकडून ईच्छुक आहेत. मात्र संभाजी पाटील निलंगेकर हे या ठीकाणी अधिक तगड्या उमेदवाराच्या शोधात आहेत. लातुरच्या सहाही विधानसभा जागांवर कमळ खुलवण्याचा त्यांचा निश्चय आहे. लोकसभा निवडणुकीवेळी याच मतदारसंघातून भाजपला काँग्रेसपेक्षा जास्त मते मिळाली होती. त्यामुळे अमित देशमुख पाटलांनी उभे केलेले आव्हान कसे पेलतात, हे पहाणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा- MAHA VIDHAN SABHA : स्वतंत्र महाराष्ट्राची पहिली निवडणूक.. तीन मुख्यमंत्री अन् शिवसेनेचा उदय

लातूरमध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. यात लातूर ग्रामीण, लातूर शहर, अहमदपूर, उदगीर, निलंगा आणि लोहा यांचा समावेश आहे. उदगीर अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. औसा मतदारसंघातून बसवराज पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. लातूर ग्रामीणचे विद्यमान आमदार त्र्यंबक भिसेंना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या जागी जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. मांजरा, रेणा आणि विकास या तीनही कारखान्यांचा या मतदारसंघात समावेश आहे. त्यांना त्याचा फायदा होईल. या कारखान्यांवरुन संभाजी पाटलांनी कित्येकदा देशमुख बंधुंना लक्ष केले आहे. या कारखान्यांनी लातूरचे पाणी पळवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निलंगेकर देशमुखांवर वार करण्याची एकही संधी सोडत नाहीत. जिल्ह्याच्या राजकारणातही त्यांनी देशमुख बंधुंना धोबीपछाड दिली होती. त्यामुळे जिल्ह्यात भाजप विरूध्द काँग्रेस लढत व्हाया देशमुख-निलंगेकर अशी पाहायला मिळणार आहे.

Intro:Body:

1 AAAAA.png

Conclusion:
Last Updated : Sep 23, 2019, 5:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.