ETV Bharat / state

बियाणे वाटपात विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांना दणका; वेतनवाढ थांबवली - बियाणे वाटपात विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांची वेतनवाढ थांबवली

बियाणे वाटप करताना कृषी सहायकांकडून शेतकऱ्यांना परमिट देणे गरजेचे असते. त्या परमिटवर शेतकरी गोडाऊनमधून बियाणे घेऊ शकतात. हे परमिट देण्यास अधिकाऱ्यांकडून दिरंगाई झाली.

वेतनवाढ थांबवली
author img

By

Published : Nov 9, 2019, 9:09 PM IST

लातूर - निलंगा येथील तालुका कृषी कार्यालयात गेल्या महिन्यात एकूण ६१५ क्विंटल हरभरा पिकाचे बियाणे आले आहे. परंतु, या बियाणाचे कृषी सहायक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेळेत वाटप केले नाही. त्यामुळे कामात दिरंगाई करणाऱ्या २९ कृषी सहायक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे.

बियाणे वाटप करताना कृषी सहायकांकडून शेतकऱ्यांना परमिट देणे गरजेचे असते. त्या परमिटवर शेतकरी गोडाऊनमधून बियाणे घेऊ शकतात. हे परमिट देण्यास अधिकाऱ्यांकडून दिरंगाई झाली. त्यामुळे तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे यांनी तालुका कार्यालयातील ३६ पैकी २९ कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखली आहे.

हेही वाचा - लातुरात डेंग्यूची साथ, मात्र परिस्थिती आटोक्यात - जिल्हाधिकारी

वेतनवाढ थांबवल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची शेतकऱ्यांना परमिट देण्यासाठी धांदल उडाली आहे. यासंबंधी तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे यांना संपर्क केला असता, बियाणे वाटपात विलंब केल्यामुळे संबंधितांची वेतनवाढ थांबवल्याचे पत्र काढले असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या आठवड्याभरात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधीने पाहणी केल्याचा फार्स करत तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश सोडले. मात्र, अद्याप शंभर टक्के पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. नुकसान भरपाईचा किचकट अर्ज भरणे शेतकऱ्यांना अवघड जात आहे. त्यातच आता कृषी कार्यालयाकडून बियाणे वाटपात हलगर्जीपणा झाल्याचे समोर आले आहे.

Intro:निलंगा कृषी कार्यालयातील बियाणे वाटपात विलंब करणाऱ्या २९ कृषी सहायकांचे वेतणवाढ थांबवली... Body:रब्बी बियाणे वाटपात विलंब करणाऱ्या २९ कर्मचाऱ्यांची तालुका कृषी अधिकाऱ्यांने वेतनवाढ थांबवली...

निलंगा/प्रतिनिधी

निलंगा येथिल तालुका कृषी कार्यालयात गेल्या महिण्यात एकून ६१५ क्विंटल हरभरा पिकाचे बियाणे आले आहे.परंतु सदरीला बियाणे तिन मंडळातील २९ कृषी सहाय्यक या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेळेत वाटप केले नाहीत तसेच त्यांना वाटपाचे परमिट दिले नसल्यामुळे तालुका कृषी कार्यालयातील ३६ कर्मचाऱ्यापैकी २९ कर्मचाऱ्यांची तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे यांनी त्यांची वेतणवाढ थांबवाली आहे.फोनवर विचारले असता तालुका कृषी अधिकाऱ्याने माहिती दिली.

गेल्या आठ दिवसाखाली झालेल्या परतीच्या मोठ्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला त्यातच प्रत्येक लोकप्रतिधीने प्रत्यक्ष पिक नुकसान पहाणी करण्याचा फार्स केला तात्काळ पंचनामे करा असे आदेशही दिले माञ अध्याप शंभर टक्के पंचनामे अधिकारी कर्मचारी यांनी केले नाहीत किचकट नुकसानीचा फाॕम बरीणाला शेतकरी वैतागून गेला आहे त्यातच शेतकऱ्यांसाठी आलेले हरभरा बियाणे वाटप न करता कृषी कार्यालयातील कर्मचारी गोडाऊन मध्ये तसेच ठेवल्याने त्यांच्यावर वेळेत वाटप केले नसल्याच्या आरोपाखाली २९ कृषी सहायकांची वेतणवाढ थांबवली आहे.वेतणवाढ थांबवताच सर्व कर्मचाऱ्यांची शेतकऱ्यांना परमिट देण्यासाठी धांदल उडाली आहे.Conclusion:यासंबंधी तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे यांना संपर्क केला असता बियाणे वाटपात विलंबा केल्यामुळे त्यांची वेतणवाढ थांबवल्याचे पञ काढले असल्याचे सांगितले
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.