लातूर- बुधवारपासून लातूर जिल्ह्यात 15 दिवसाचे लॉकडाऊन असणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नियमांची अंमलबजावणी व्हावी याकरिता विविध यंत्रणा राबवली आहे. तर दुसरीकडे उद्यापासून सर्व काही बंद असल्याने लाॅकडाऊनच्या पूर्वसंध्येला नागरिकांनी बाजारात एकच गर्दी केली होती. बंदच्या धास्तीने लातूरकरांनी विविध साहित्य घेण्यासाठी तोबा गर्दी केली होती.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे 15 जुलैपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा बंद राहणार आहेत. त्यामुळे किराणा आणि इतर साहित्य घेण्यासाठी शहरातील गंजगोलाईत नागरिकांनी एकच गर्दी केली होती. तर दुसरीकडे उद्यापासून नियमांची कडक अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित आलेले 388 रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. तर 356 जणांवर उपचार सुरू आहेत. वाढती रुग्ण संख्या पाहता सर्वपक्षीय नेत्यांची वैठक पार पडली. या बैठकीनंतर लॉकडानचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे किराणा दुकान, भाजीमंडई तसेच इतर साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे लॉकडानची नियमावली सांगितली जात असतानाच दुसरीकडे नागरिकांनी केलेली गर्दी असे विरोधाभासाचे चित्र शहरात पाहवयास मिळाले. लॉकडाऊन हा काही सर्वतोपरी पर्याय नाही पण वाढत असळलेली रुग्णांची साखळी तोडण्यासाठी या लॉकडाऊनचा उपयोग होणार असल्याचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय कृषी संबंधित सर्व काही सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले आहे.