ETV Bharat / state

जिल्हापरिषदेचा 'अभिनव लातूर पॅटर्न' : ग्रामीण भागात शिक्षणाची जबाबदारी 'कोविड कॅप्टन' वर - Online Education News

ऑनलाइन शिक्षण सर्वांनाच शक्य नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेतर्फे 'कोविड कॅप्टन'चा वेगळा उपक्रम राबविला जात आहे. गावात नियुक्त केलेले कोविड कॅप्टन स्वतःच्या मुलांबरोबर गल्लीतील मुलांना शिक्षणाचे धडे देत आहेत. शिवाय, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना घरपोच पाठ्यपुस्तके दिली आहेत. यामागे स्मार्ट फोन नसलेली आणि ऑनलाइन पाठ्यक्रम शिकू न शकणारी खेडेगावांमधील मुले शिक्षणापासून दूर राहू नयेत, अशी संकल्पना आहे.

लातूर कोविड कॅप्टन
लातूर कोविड कॅप्टन
author img

By

Published : Aug 26, 2020, 1:40 PM IST

लातूर - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आ‌ॅनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब केला जात असला तरी गाव, खेड्यातील विद्यार्थ्यांची स्थिती पाहता लातूर जिल्हा परिषदेने अनोखा उपक्रम घेतला आहे. खेड्यातील विद्यार्थ्यांना गावच्या कट्ट्यावर, पारावर तसेच मंदिरात सोशल डिस्टन्सचे पालन करून शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. शिक्षणाची ही जबाबदारी गावातील सुशिक्षित बेरोजगार, पुण्या-मुंबईहून परतलेल्या तरुणांवर तसेच माजी शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. या कोविड कॅप्टनच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जात आहेत.

जिल्हापरिषदेचा 'अभिनव लातूर पॅटर्न' : ग्रामीण भागात शिक्षणाची जबाबदारी 'कोविड कॅप्टन' वर

शिक्षण क्षेत्रात लातूर पॅटर्नची वेगळी ओळख आहे. मात्र, कोरोनाने ओढवलेल्या परस्थितीमुळे इतिहासात प्रथमच लातूर शहरात विद्यार्थ्यांचा शुकशुकाट आहे. शिवाय, अडीचशे कोचिंग क्लासेस सध्या बंद आहेत. यावर पर्याय म्हणून खासगी संस्था आणि क्लासेस चालकांनी ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग निवडला. परंतु, वाडी-वस्त्यांवरील आणि तांड्यावरील विद्यार्थ्यांकडे ना मोबाईल आहेत, ना ऑनलाइन शिक्षणाची सोय. यावर पर्याय म्हणून जिल्हा परिषदेने अनोखा उपक्रम राबवला आहे. याच्यामुळे गावागावात सुशिक्षित बेरोजगार, पुण्या-मुंबईहून परतलेले तरुण तसेच माजी शिक्षक आता कोविड कॅप्टन बनले आहेत. त्यांच्यावर विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी दिली आहे.

गावात नियुक्त केलेले हे कोविड कॅप्टन स्वतःच्या मुलाबरोबर गल्लीतील मुलांना शिक्षणाचे धडे देत आहेत. शिवाय जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना घरपोच पाठ्यपुस्तके दिली आहेत. स्वयंप्रेरणने काम करणारे हे कॅप्टन हे दररोज एका विषयानुसार सहअध्ययन पद्धतीने गट चर्चा, कृती करून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास घेत आहेत. शिवाय, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परीक्षेच्या वतीने शाळा बंद पण शिक्षण सुरू ही अभ्यासालाही वेगवेगळ्या वाहिन्यांहून सुरू आहे. राज्य सरकारच्या या उपक्रमाला लातूर जिल्हा परिषदेच्या कोविड कॅप्टनचीही साद मिळत आहे.

ग्रामीण भागातील सर्वच विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन असतील असे नाही. त्यामुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून हे विद्यार्थी दूर राहू नयेत, म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अभिनव गोयल यांनी ही संकल्पना मांडली होती. पंधरा दिवसानंतर हा उप्रकम आता गावागावात पाहवयास मिळत आहे. जिल्ह्यातील १३०० जिल्हा परिषदेच्या ठिकाणी ४ हजार ७१६ कोविड कॅप्टनची नेमणूक करण्यात आली आहे. यातून पूर्णपणे शाळेप्रमाणे अभ्यासक्रम तर पूर्ण होणार नाही, पण विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहणार हे नक्की.

शिक्षण क्षेत्रात लातूर पॅटर्न महत्त्व अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या या संकल्पनेतून सुरू असलेल्या उप्रकमाचे कौतुक होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.