ETV Bharat / state

उदगीरच्या नगरसेविकेच्या नवऱ्याचा पराक्रम; बलात्कारानंतर पुन्हा विनयभंग, दोनदा अटक - Udgir City Police Thane

जिल्ह्याच्या उदगीर शहर नगरपालिकेच्या कॉंग्रेसच्या एका महिला नगरसेविकेच्या नवऱ्याने बलात्काराचा गुन्हा पोलीस दफ्तरी दाखल असताना त्याच महिलेचा पुन्हा विनयभंग करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याने उदगीर शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

नगरसेविकेच्या नवऱ्याचा पराक्रम
नगरसेविकेच्या नवऱ्याचा पराक्रम
author img

By

Published : Aug 31, 2021, 6:36 AM IST

लातूर - जिल्ह्याच्या उदगीर शहर नगरपालिकेच्या कॉंग्रेसच्या एका महिला नगरसेविकेच्या नवऱ्याने बलात्काराचा गुन्हा पोलीस दफ्तरी दाखल असताना त्याच महिलेचा पुन्हा विनयभंग करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याने उदगीर शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

उदगीर शहरातील नोबल कॉलनीत वास्तव्यास असणाऱ्या एका महिलेला मागील अडीच महिन्यांपासून सतत पाठलाग करून वाईट नजरेने बघणे, फिर्यादी महिलेचे समोर अश्लील भाषेत शेरेबाजी करणे, अश्लील हावभाव करीत त्रास देणे, फिर्यादीची आई समजावून सांगण्यास गेली असता तिला 'ती कशी जगते मी बघतो' अशी धमकी दिल्या कारणाने उदगीर शहर पोलीस ठाण्यात आरोपी नगरसेवक पती मिर्झा अक्रम बेग (रा.समतानगर) डॅम रोड उदगीर याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, मागील एक वर्षापूर्वी याच पतीवर याच महिलेच्या फिर्यादीवरुन बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिल्या कारणाने गुन्हा दाखल झाला होता. त्यात त्याला काही महिने अटकही झाली होती. नंतर तो जामिनावर बाहेर आला आणि पुन्हा याच महिलेला त्रास देण्याच्या उद्देशाने या आरोपीने पाठलाग करून अश्लील शेरेबाजी व हावभाव करणे सुरु केले होते. त्यामुळे पुन्हा त्याच महिलेने फिर्याद दिल्याने या नगरसेवक आरोपी नव-याला पुन्हा अटक करण्यात आली असून त्यास उदगीरच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला असल्याची माहिती उदगीर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी 'ई-टीव्ही भारत'ला दुरध्वनीवरुन दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.