ETV Bharat / state

कोरोनाच्या चाचणीसह अहवाल लातुरमध्येच मिळणार; उपचाराला येणार गती - government medical college Latur

पालकमंत्री अमित देशमुख यांनी गेल्या आठवड्यात कोरोनाच चाचणी सुरू होणार असल्याची माहिती दिली होती. रुग्णांच्या चाचणीचे प्रत्यक्ष अहवाल येण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी दिवसभरात ५० व्यक्तींची तपासणी करून येथेच अहवाल उपलब्ध करण्यात आले आहेत.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

author img

By

Published : Apr 26, 2020, 12:21 PM IST

Updated : Apr 26, 2020, 12:32 PM IST

लातूर - कोरोना चाचणीसाठी आवश्यक असलेले घश्याचे स्त्राव (स्वॅब) घेवून त्यासंबंधीचे अहवाल लातूरमध्येच मिळणार आहेत. ही कोरोनाची चाचणी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यात आली आहे.

लातूर शहर व जिल्ह्यातील रुग्णांच्या कोरोना चाचणीसाठी स्वॅब हे पुणे येथील प्रयोशाळेत दिले जात होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात अहवाल मिळण्यास विलंब लागत होता. त्यांनतर काही दिवसांमध्ये हेच नमुने सोलापूरला पाठविण्याची सोय झाली होती. मात्र, सोलापूरसह उस्मानाबाद, लातूर येथील सर्व नमुने एकाच ठिकाणी असल्याने एक ते दोन दिवसांचा कालावधी लागत होता. मात्र, राज्यात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाच्या चाचणीसाठी नमुने घेतलेल्याच ठिकाणी अहवाल मिळण्याची सोय करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कोरोना तपासणीचे अहवाल हे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात उपलब्ध होणार आहेत.

कोरोनाच्या चाचणीसह अहवाल लातुरमध्येच मिळणार

हेही वाचा-कोरोनाची टेस्ट, उपचार मोफत; रुग्णांनी स्वतःहून समोर येण्यासाठी निर्णय

पालकमंत्री अमित देशमुख यांनी गेल्या आठवड्यात कोरोनाच चाचणी सुरू होणार असल्याची माहिती दिली होती. रुग्णांच्या चाचणीचे प्रत्यक्ष अहवाल येण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी दिवसभरात ५० व्यक्तींची तपासणी करून येथेच अहवाल उपलब्ध करण्यात आले आहेत. कोरोनाची चाचणी व उपचार मोफत आहेत. चाचणी करण्याचा व अहवाल मिळण्याचा वेळ वाचणार असल्याने रुग्णांवर वेगाने उपचार करणे शक्य होणार आहे.

हेही वाचा-लातुरात कोरोनाचा पहिला बळी

गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्हा हा ग्रीनझोनमध्ये होता. मात्र, उदगीरच्या 70 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याने लातूर जिल्हा पुन्हा ऑरेंज झोनमध्ये गेला. या महिलेचा मृत्यू झाला आहे.

Last Updated : Apr 26, 2020, 12:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.