लातूर - सध्या संपूर्ण मराठवाडा दुष्काळाने होरपोळत असून यामध्ये सर्वाधिक झळा लातूर जिल्ह्याला सहन कराव्या लागत आहेत. त्या अनुषंगाने लातुरातील सभेत मुख्यमंत्री काय बोलणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र, अपेक्षेप्रमाणे मुख्यानमंत्र्यांनी उजनीचे पाणी लातूरकरांना मिळणार ही जुनीच घोषणा, नव्या जोमात केली. त्यामुळे सभास्थळी उजनी धरणाच्या पाण्याचा घाट याची चर्चा जोरात रंगली होती.
लातूर शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शनिवारी मुख्यमंत्री शहरात असतानाच आता 15 दिवसातून एकदा पाणी या जिल्हा प्रशासनाच्या घोषणेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र, पाणी टंचाईच्या झळा लागताच लातूरकरांसह येथील राजकीय नेत्यांना नेहमीच उजनीच्या पाण्याची आठवण होत असते.
5 वर्षांपूर्वी उजनीच्या पाण्यावरून सबंध मंत्रीमळाची बैठक लातुरात पार पडली होती. मात्र, उजनीच्या पाण्याचा प्रश्न आजही कायम आहे. आता पुन्हा टंचाईच्या काळात जनतेला आणि विधानसभेच्या रणसंग्रामात राजकीय नेत्यांना हा मुद्दा मिळाला आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरला उजनीचेच पाणी देणार अशी घोषणा केली. मात्र, खरोखरच याची अंमलबजावणी होणार का निवडणुकीच्या तोंडावर दाखविलेले गाजर आहे याबाबत लातूरकारांच्या मनात संभ्रमाता कायम आहे.
घोषणा जुनीच असली तरी ती लातूरकरांच्या हिताची असून त्याची अंमलबजावणी होईल अशी लातूरकरांना अपेक्षा आहे. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यात 3 जाहीर सभा घेतल्या. तसेच यातून जनतेचा आशीर्वाद मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.