ETV Bharat / state

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला असुरक्षित - चित्रा वाघ

मुख्यमंत्री 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' यातच व्यस्त आहेत. पण संपूर्ण राज्य हे त्यांचे कुटुंब असल्याचा त्यांना विसर पडला आहे. कुटुंबातील सदस्याप्रमाणेच राज्यातील महिलांची सुरक्षितता जपणे आवश्यक असल्याचा टोला चित्रा वाघ यांनी लगावला.

chitra wagh
चित्रा वाघ
author img

By

Published : Nov 7, 2020, 7:17 PM IST

लातूर - दिवसेंदिवस राज्यातील महिलांवर अत्याचार वाढत आहेत. केवळ सरकारचे अपयश समोर येऊ नये म्हणून आशा घटना दाबल्या जात आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या घटना वाढत असून महिलांवरील अत्याचार म्हणजे खाकीला काळिमा असल्याचा आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे.

मुख्यमंत्री 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' यातच व्यस्त आहेत, असे म्हणत चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

महिला सुरक्षेबाबत सरकारचे अपयश सातत्याने समोर येत आहे. एवढेच नाही तर मध्यंतरी कोविड सेंटरमध्येही अत्याचाराच्या घटना घडल्या असून जगात अशा घटना कुठेच झाल्या नाहीत त्या महाराष्ट्रात होत आहेत. मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पीक नुकसान पाहणीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यात आले असता या दरम्यान उमरगा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. केवळ सरकारचे अपयश समोर येऊ नये म्हणून पोलीस ठाण्यात याची नोंदही घेण्यात आली नव्हती परंतु, भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आवाज उठविल्यामुळे अखेर तक्रार दाखल करण्यात आली आहे. केवळ एका भागात नाहीतर राज्यात सर्वत्रच अशा घटना घडत आहे. महिलांच्या सुरक्षेतेबाबत राज्य सरकार गंभीर नाही. दुसरीकडे हॉटेल, लॉज, जिम यासाठी नियमावली जारी करण्यास प्राधान्य दिले जात आहे. पण महिलांच्या सुरक्षेतेबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही, हे दुर्दैव असल्याचे यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या. महिलांचे प्रश्न घेऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार अभिमन्यू पवार, शहराध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

केवळ कुटुंबाची जबाबदारी न घेता राज्याची घ्यावी -
मुख्यमंत्री 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' यातच व्यस्त आहेत. पण संपूर्ण राज्य हे त्यांचे कुटुंब असल्याचा त्यांना विसर पडला आहे. कुटुंबातील सदस्याप्रमाणेच राज्यातील महिलांची सुरक्षितता जपणे आवश्यक असल्याचा टोला यावेळी चित्रा वाघ यांनी लगावला. एकंदरीत महिलांच्या प्रश्नावरून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.