ETV Bharat / state

'त्या' 12 जणांना आश्रय देणाऱ्यांवर गुन्हा दाखल - चुकी

2 एप्रिल रोजी रात्री हे 12 नागरिक निलंगा येथे आले होते. त्याचवेळी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे होते. मात्र, काही व्यक्तींनी त्यांना एका धार्मिक स्थळाचा आश्रय दिला आणि तिथेच त्यांची सोय केली. हा सर्व गैरप्रकार असून आश्रय देणाऱ्यांच्या चुकीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका होता. त्यामुळे त्यांना आश्रय देणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय या नागरिकांना सोडून पळ काढलेल्या वाहन चालकावरही कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी जी. श्रीकांत
जिल्हाधिकारी जी. श्रीकांत
author img

By

Published : Apr 6, 2020, 8:35 PM IST

लातूर - निलंगा येथे एका धार्मिक स्थळी दाखल झालेल्या 12 जणांपैकी 8 जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जमातीसाठी गेलेले ते 12 नागरिक लातुरातील निलंगा शहरात आले कसे. त्यांना परवानगीचा पास देण्यात आला कसा याची सखोल चौकशी होण्यास आता सुरवात झाली आहे. पासचा आधार घेऊन त्यांनी निलंग्यात प्रवेश केला असला तरी त्यांना क्वारंटाईन करणे आवश्यक होते. असे न होता त्यांना धार्मिक ठिकाणी आश्रय देण्यात आला होता. त्यामुळे आश्रय देणाऱ्यांवर आता गुन्हा दाखल करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले आहे. शिवाय दरम्यानच्या प्रवासात त्यांच्या संपर्कात आलेल्यांची महिती घेणेही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

बोलताना जिल्हाधिकारी

मूळचे लातूर मधील नागरिकांना नाही तर लातूरात दाखल होताच कोरोना झाल्याचे निष्पन्न झालेल्या 8 व्यक्तींना येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. 2 एप्रिल रोजी रात्री हे 12 नागरिक निलंगा येथे आले होते. त्याचवेळी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे होते. मात्र, काही व्यक्तींनी त्यांना एका धार्मिक स्थळाचा आश्रय दिला आणि तिथेच त्यांची सोय केली. हा सर्व गैरप्रकार असून आश्रय देणाऱ्यांच्या चुकीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका होता. त्यामुळे त्यांना आश्रय देणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय या नागरिकांना सोडून पळ काढलेल्या वाहन चालकावरही कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तर हरियाणा येथील फिरोजपूर जिरका येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी सध्याच्या लॉकडाऊनमध्ये जाण्याची परवानगी दिली कशी याबाबत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे पत्रही हरियाणा राज्याच्या सचिवांना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले. त्यामुळे आंध्रप्रदेश येथील 12 व्यक्ती हे धार्मिक कार्यक्रमासाठी हरियाणा येथे गेले आणि ते परतताना निलंग्यात दाखल झाले. या सर्व प्रवासाची चौकशी आता प्रशासकीय स्तरावर होत असल्याचे पाहवयास मिळत आहे.

आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचा सतर्कपणा

निलंगा येथील एका धार्मिक स्थळी 12 नागरिक दाखल झाल्याची माहिती आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना माहिती देऊन याबाबत योग्य तो निर्णय घेण्याच्या सुचना केल्या होत्या. नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे व निलंग्यातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून या 12 जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.

हेही वाचा - सोशल मीडीयावर आक्षेपार्ह पोस्ट, लातूरमध्ये एकावर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.