ETV Bharat / state

मुलाच्या लग्नाचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले ५१ हजार रुपये... - latur corona news

व्यापारी तानाजी सूर्यवंशी (माकणीकर) यांनी आपल्या मुलाचा विवाह साध्या पद्धतीने करत अवाढव्य खर्च टाळून तो मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला आहे.

nilanga latur
व्यापाऱ्याने मुलाच्या लग्नाचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले ५१ हजार रुपये...
author img

By

Published : May 20, 2020, 3:19 PM IST

निलंगा (लातूर) - व्यापाऱ्याने मुलाच्या लग्नाचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५१ हजार रुपये दिले आहेत. निलंगा येथील व्यापारी तानाजी सूर्यवंशी (माकणीकर) यांनी आपल्या मुलाचा विवाह साध्या पद्धतीने करत अवाढव्य खर्च टाळून तो मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला आहे.

व्यापाऱ्याने मुलाच्या लग्नाचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले ५१ हजार रुपये...

निलंगा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी यांचा मुलगा सुनील आणि श्रद्धा यांचा विवाह ठरला होता. मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा संपन्न होणार होता. परंतु, देशावर कोरोनाचे मोठे संकट आले आहे. कोरोना या महाभयंकर रोगामुळे अनेकांना आधार देण्याची गरज आहे.

कोरोनाची सध्याची परिस्तिथी पाहून अतिशय साध्या पद्धतीने मोजक्याच पाहुण्याच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पाडला. यात सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत लग्न खर्च टाळून तानाजी सूर्यवंशी परिवारातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस ५१ हजार रुपयेचा धनादेश उपविभागीय अधिकारी, निलंगा विकास माने व तहसीलदार गणेश जाधव यांच्याकडे सुपूर्द केला. सूर्यवंशी परिवाराने केलेला हा विवाह इतरांसाठी आदर्श ठरला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.