ETV Bharat / state

पेरलं पण उगवलचं नाही... शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट - लातूर पेरणी बातमी

खरीपाच्या तोंडावर वरुणराजाने दमदार एन्ट्री केली. त्यामुळे हंगामाच्या आठ दिवसांमध्येच पेरणीला पोषक वातावरण निर्माण झाले. मशागत, कोळपणी यासारखी कामे उरकताच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ धरली.

bogus-seed-to-farmer-in-latur
पेरलं पण उगवलचं नाही..
author img

By

Published : Jun 23, 2020, 5:22 PM IST

लातूर - यावेळी मान्सूनचा पाऊस वेळेत दाखल झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या अगदी वेळेत होत आहेत. काही शेतकऱ्यांची पेरणी झालेली आहे. मात्र, पेरलेल्या बियाणांची उगवणच झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट ओढावले आहे. यंदा सर्व काही वेळेत होत असताना कृषी विभागाचा हलगर्जीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर आला आहे.

पेरलं पण उगवलचं नाही..

खरीपाच्या तोंडावर वरुणराजाने दमदार एन्ट्री केली. त्यामुळे हंगामाच्या आठ दिवसांमध्येच पेरणीला पोषक वातावरण निर्माण झाले. मशागत, कोळपणी यासारखी कामे उरकताच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ धरली. मात्र, हंगामाच्या सुरुवातीपासूनच कृषी विभागच्या धोरणांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. खरीपासाठी ३ लाख क्विंटल बियाणांची आवश्यकता असताना केवळ पन्नास टक्केच बियाणे कृषी विभागाकडून उपलब्ध झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना घरच्या बियाणांवर भर द्यावा लागला होता.

घरगुती बियाणे वापरताना त्यावर योग्य प्रक्रिया करावी, त्याची उगवण झाल्यावरच पेरणी करावी अशाप्रकारचे मार्गदर्शन करणाऱ्या कृषी विभागाने मात्र, उगवण क्षमता नसलेली बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारलेले आहे. जिल्ह्यात शेकडोहून अधिक शेतकऱ्यांनी याबद्दल तक्रारी केल्या आहेत. तर ११० हेक्टरावरील बियाणांची उगवण झाली नसल्याची नोंद सरकार दप्तरी करण्यात आली आहे.

प्रत्यक्षात हे क्षेत्र जरी वाढीव असले तरी याकडे कृषी विभागाकडून कानाडोळा केला जात आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. अगोदरच शेतकरी आर्थिक संकटात आहे. एका एकरातील पेरणी करण्यााठी शेतकऱ्यांना सरासरी १० हजार रुपये मोजावे लागतात. याकरिता हात ऊसणे किंवा शेतकऱ्यांनी कर्ज काढलेले आहे. त्यात पुन्हा दुबार परेणीचा खर्च कसा करावा, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीचा ओघ कायम असल्याने याबाबत जिल्हा स्तरावर चौकशी समिती नेमण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या बियाणांची उगवण क्षमता पाहिली जात आहे. शिवाय पंचनामेही केले जात आहेत.

मात्र, सर्वच शेतकऱ्यांबद्दल असे होताना दिसत नाही. त्यामुळे दुबार पेरणी करावी तरी कशी, असा सवाल कायम आहे. गतवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे अंतिम टप्प्यात खरीपातील सर्वच पिकांचे नुकसान झाले होते. यंदा तर सुरुवातीलाच कृषी विभागाच्या कारभाराचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.