ETV Bharat / state

लातूर शहर मतदारसंघात भाजपची लढत काँग्रेसपेक्षा वंचितसोबत अधिक - शैलेश लाहोटी

लातूर शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार असलेले शैलेश लाहोटी यांनी, यावेळी आपला प्रतिस्पर्धी हा काँग्रेस नसून खरी लढत वंचित बहुजन आघाडीसोबत आहे, असे बोलत काँग्रेसला वेगळ्या पद्धतीने आव्हान दिले आहे.

लातूर शहर विधानसभा मतदारसंघ
author img

By

Published : Oct 5, 2019, 2:22 PM IST

लातूर - शुक्रवारी भाजप उमेदवार शैलेश लाहोटी यांनी शक्तिप्रदर्शन करत लातूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी काँग्रेस हा माझा प्रतिस्पर्धी नसून खरी लढत ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराबरोबर असल्याचे लाहोटी यांनी सांगितले आहे. त्यामुळे भाजपकडून काँग्रेसला यावेळी वेगळ्या पद्धतीने आव्हान दिले गेले आहे.

लातूर शहर विधानसभा मतदारसंघात अमित देशमुख यांच्या विरोधात भाजपकडून शैलेश लाहोटी रिंगणात

हेही वाचा... लातूरच्या तरुणाईचा सरकारकडून अपेक्षाभंग; बेरोजगारी, शैक्षणिक समस्या आजही कायम

लातूर शहरासाठी उमेदवारी कोणाला यावरून गेल्या अनेक दिवसांपासून तर्क-वितर्क लावले जात होते. अखेर अमित देशमुख यांचे गतवेळचे प्रतिस्पर्धी शैलेश लाहोटी यांनाच रिंगणात उतरवले गेले आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर लाहोटी यांच्या सोबत बातचीत केली असता त्यांनी, गेल्या अनेक वर्ष काँग्रेस पक्षाकडे सत्ता नसल्याने त्यांच्याकडे विकासाचा मुद्दाच नाही. काँग्रेसकडे मुद्देच नसल्याने आपल्याला ही निवडणूक सोपी आहे. शिवाय माझी खरी लढत वंचित आघाडी सोबत आहे. असे मत लाहोटी यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा... औस्यात भाजपकडून अभिमन्यू पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल; भर पावसात शक्तिप्रदर्शन

शुक्रवारी लाहोटी यांनी आपल्या समर्थकांसह लातूर तहसील कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली असून या वेळेस आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहोत, असेही शैलेश लाहोटी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा... लातूर शहरातील अपक्ष उमेदवाराची शक्कल, अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ

Intro:बाईट : शैलेश लाहोटी, भाजपा उमेदवार

लातूर शहर विधानसभा : खरी लढत वंचित आघाडी सोबतच : शैलेश लाहोटी
लातूर : लातूर शहरासाठी भाजपकडून शैलेश लाहोटी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शुक्रवारी शक्तिप्रदर्शन करीत लाहोटी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस माझा प्रतिस्पर्धी नसून खरी लढत हि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराबरोबर असल्याचे सांगितले. त्यामुळे काँग्रेसला वेगळ्यापद्धतीने त्यांनी आव्हान दिले आहे
Body:लातूर शहरासाठी उमेदवारी कुणाला यावरून गेल्या अनेक दिवसांपासून तर्क-वितर्क काढले जात होते. अखेर अमित देशमुख यांचे गतवेळचे प्रतिस्पर्धी शैलेश लाहोटी हेच रिंगणात उतरले आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षात काँग्रेस पक्षाकडे सत्ता नसल्याने त्यांच्याकडे विकासाचा मुद्दाच नाही. काँग्रेसकडे मुद्देच नसल्याने आपल्याला ही निवडणूक उलट सोपी आहे. शिवाय माझी खरी लढत वंचित आघाडी सोबत असल्याचे स्पष्ट मत लातूर शहर विधानसभेचे भाजपाचे अधिकृत उमेदवार शैलेश लाहोटी यांनी स्पष्ट केले. शैलेश लाहोटी यांनी समर्थकांसह लातूर तहसील कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली असून या वेळेस आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहोत. Conclusion:यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर खासदार सुधाकर शृंगारे, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, नगरसेवक शैलेश गोजमगुंडे, रागिनी यादव, गीता गोड, शिवसेनेचे पप्पू कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष नामदेव चारक, विष्णुपंत साठे, रमेश पाटील, श्वेता लोंढे, प्रवीण कस्तुरे आदी उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.