निलंगा (लातूर) - आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या घरासमोर मराठा समाजाचे घंटानाद आंदोलन झाले. यावेळी मराठा क्रांती मोर्चामधील महिलांनी विविध मागण्याचे निवेदन आमदार निलंगेकर यांना दिले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवावी. तसेच, समाजाच्या मुला-मुलींसाठी शहरात वसतीगृह निर्माण करावे, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
शहरातील अंजठा मंदिर येथील आमदार पाटील-निलंगेकर यांच्या घरासमोर तालुक्यातील मराठा समाजाच्या काही लोकांनी महिलांसह घंटानाद आंदोलन केले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षाला स्थगिती दिली आहे, ती उठवावी. यासह अनेक मागण्या मान्य कराव्यात, अशा घोषणा यावेळी मराठा समाजाच्या वतीने देण्यात आल्या. या आंदोलनात काँग्रेसचे अशोक पाटील-निलंगेकर सहभागी झाले होते. समाजाच्या अडचणीत व न्याय हक्कासाठी एक मराठा म्हणून प्रयत्न करेन, असे अशोक पाटील-निलंकेर म्हणाले. या वेळी, एम. एम. जाधव, विनोद सोनवणे, कुमोद लोभे, अरुण सोळुंके, सतीश हानेगावे, दगडू सोळुंके किशोर जाधव उपस्थित होते.
'मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी मी सदैव अग्रेसर असेन. सत्तेत असताना मराठा समाजाच्या राज्य समितीमध्ये मी होतो. तेव्हा समाजाच्या व्यथा मी सक्षमपणे मांडल्या आहेत. येणाऱ्या काळातही मी स्वतः रस्त्यावर उतरून न्याय मागेन', असे आश्वासन आमदार निलंगेकर यांनी दिले.
हेही वाचा - ....तर मराठा आरक्षणसंदर्भातला निर्णय वेगळा असता - आमदार पवार