ETV Bharat / state

Akash Gaud : हलाखीच्या परिस्थितीवर मात करत लातूरच्या आकाश गौडची वेटलिफ्टिंगमध्ये भरारी! - आकाश गौड सुवर्णपदक

लातूरच्या दयानंद महाविद्यालयात शिकणाऱ्या आकाश गौडने खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये वेटलिफ्टिंग खेळात सुवर्णपदक जिंकले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत त्याने ही कामगिरी केली आहे. पहा ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने आकाशशी केलेली खास बातचीत..

Akash Gaud
आकाश गौड
author img

By

Published : Jun 6, 2023, 7:15 PM IST

Updated : Jun 6, 2023, 7:34 PM IST

आकाश गौड

लातूर : अत्यंत खडतर परिस्थितीशी दोन हात करत लातूरच्या आकाश गौड याने वेटलिफ्टिंग खेळात दिमाखदार कामगिरी केली आहे. 30 मे रोजी वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठात झालेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये आकाशने सुवर्णपदक पटकावत लातूरचा डंका अख्या देशभर गाजवला आहे.

आकाशची कामगिरी : लातूरच्या दयानंद महाविद्यालयात शिकणाऱ्या आकाशने नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत वेटलिफ्टिंगच्या 55 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले आहे. जबरदस्त लिफ्टिंग व स्ट्रॉंग स्ट्रेच मारत विरोधी खेळाडूंपेक्षा अधिक भार उचलून त्याने ही किमया केली. त्याने स्ट्रेचमध्ये 103 किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये 125 किलो असे एकूण 228 किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकाविले आहे. काही दिवसांपूर्वीच चंदीगड येथे झालेल्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ स्पर्धेत 334 किलो वजन उचलत त्याने सुवर्णपदक जिंकले होते. शिवाय पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक स्पर्धेतही त्याने रौप्य पदकाची कमाई केली होती.

आर्थिक परिस्थिती हलाखीची : आकाशच्या घरची परिस्थिती हलाखीची असून आई मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. आकाशही जिममध्ये काम करून आईला हातभार लावतो. आकाश सध्या लातूरच्या दयानंद महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेतो आहे. तो बालपणापासूनच औसा तालुक्यातील पानचिंचोली येथे मामाच्या गावी राहतो. वडील लहानपणीच सोडून गेल्याने कुटुंबाची पूर्ण जबाबदारी आकाशची आई सुनीता यांच्यावर आहे. सुनिता गौड या मोलमजूरी करून संसाराचा गाडा हाकतात. आईला हातभार म्हणून आकाश आपल्याच महाविद्यालयातील जिममध्ये पार्ट टाइम जॉब करून डायटचा जेमतेम खर्च भागवत आहे. आकाशकडे खेलो इंडिया स्पर्धेत जाण्यासाठीही पैसे नव्हते. लोकांकडून पैसे उसने घेऊन त्याने ही सुवर्ण किमया केली आहे.

डाएटसाठी पैसे नाहीत, पुढची शर्यत कठीणच : परिस्थितीशी दोन हात करत आकाशने वेटलिफ्टिंगमध्ये विद्यापीठासह लातूरचे नाव देशात कमावले. परंतु अद्याप आकाशच्या या कामगिरीची दखल ना प्रशासनाने घेतली ना राज्यकर्त्यांनी. येणाऱ्या काळात आकाशला वेटलिफ्टिंगमध्ये देशाचे नेतृत्व करायचे आहे. परंतु परिस्थितीच्या जोखडात अडकलेल्या आकाशला व त्याच्या आईला भविष्यातील या शर्यतीवर मात करण्यासाठी मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो आहे. आपले स्वप्न साकार करण्यासाठी आकाशला आर्थिक मदतीची गरज आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करायचे असल्याचे आकाशने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. परंतु आर्थिक मदतीशिवाय मोलमजुरी करून डायटचा खर्च कसा भागवायचा? असा सवाल आकाशने उपस्थित केला आहे.

हेही वाचा :

  1. Tushar Deshpande Journey : कर्करोगामुळे आई गमावली ; कल्याणच्या तुषारची मैदानाबाहेरील इनिंगही आहे थक्क करणारी!
  2. Asian Weightlifting Championship 2023 : 20 वर्षीय जेरेमीचा पराक्रम, आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकले रौप्यपदक!

Last Updated : Jun 6, 2023, 7:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.