लातूर - विविध मागण्यासांठी अंगणवाडी सेविका मदतनीसांनी निलंगा पंचायत समिती समोर धरणे आंदोलन केले. हे आंदोलन महाराष्ट्र राज्य महासंघाच्या वतीने करण्यात आले. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी पाटील यांना यावेळी विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
३० एप्रिल, २०१४ च्या शासन निर्णयानुसार एकात्मिक बाल विकास प्रकल्पातील सेवा निवृत झालेल्या, राजीनामा दिलेल्या तसेच सेवेतून कमी केलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांना सेवा समाप्ती नंतरचा एक रकमी लाभ मिळालेला नाही. थकित प्रवास भत्ता, इंधन बिल प्रलंबित आहे, ते तात्काळ द्यावे. आधार लिंक न झालेल्या बँक खात्यात मानधन जमा झाले नाही, ते ऑफलाईन अदा करावे. फोनवरून ऑनलाईन काम करण्यासाठी लागणारा डाटा पैसे तीन महिण्यात द्यावे. रविवारचा आहार वाटप बंद करावा. मोबाईल हरवल्यास चोरीला गेल्यास दुसरा द्यावा व दुरूस्ती खर्च शासनाने करावा, अशा अनेक मागण्या घेऊन काल (सोमवार) निलंगा पंचायत समिती समोर शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनीस बसल्या होत्या. एका महिण्यात या मागण्या मंजूर नाही झाल्यास बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा, यावेळी महाराष्ट्र राज्य महासंघाचे प्रदेश अध्यक्ष भगवान देशमुख यांनी दिला.
हेही वाचा - 'एचआयव्ही' म्हणजे 'हॅपी इंडियन व्हिलेज'; शेकडो अनाथांना जीवन देणारे सेवालय