ETV Bharat / state

लातूर-चाकूर मार्गावर अपघात; ओव्हरटेकच्या नादात एकाचा जागीच मृत्यू

author img

By

Published : Mar 12, 2020, 7:37 PM IST

जनावळ (ता. चाकूर) येथील अजय सुग्रीव शिंदे हा दुचाकीवरून लातूरकडे येत होता. दरम्यान, नांदगाव फाट्याजवळ एका वाहनाला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या दुचाकीला त्याची गाडी धडकली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

accident
लातूर-चाकूर मार्गावर जबरदस्त अपघात; ओव्हरटेच्या नादात एकाचा जागीच मृत्यू

लातूर - लातूर-चाकूर मार्गावरील नांदगाव फाट्याजवळ दोन दुचाकींमध्ये अपघात झाला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाला आहे. जखमी तरुणाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - नागपुरात 'स्कूल'बसचा अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली

जनावळ (ता. चाकूर) येथील अजय सुग्रीव शिंदे हा दुचाकीवरून लातूरकडे येत होता. दरम्यान, नांदगाव फाट्याजवळ एका वाहनाला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या दुचाकीला त्याची गाडी धडकली. यामध्ये अजयचा जागीच मृत्यू झाला, तर समोरच्या दुचाकीवरील शफीक खलील शेख हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटना समजताच चाकूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रस्त्याची दुरवस्था त्यात ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडली असून २५ वर्षीय अजयला जीव गमवावा लागला आहे. रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी मृतदेह हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.