ETV Bharat / state

गुटखा विक्रेत्याकडून लाच घेणारा पोलीस नाईक एसीबीकडून चौकीसमोरच जाळ्यात

अहमदपूर येथे धनंजय गुणाले या 36 वर्षीय पोलीस नाईकने पानटपरीमध्ये गुटखा विक्रीकरण्यासाठी संबधिताकडे 2 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. ताजबंद पोलीस चौकीच्या समोरच एसीबीच्या पथकाने गुणाले यांना तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना सोमवारी सायंकाळी रंगेहात पकडले.

लाच लुचपत प्रतिबंध कार्यालय लातूर
लाच लुचपत प्रतिबंध कार्यालय लातूर
author img

By

Published : Oct 13, 2020, 2:00 AM IST

लातूर - अवैध धंद्यावर कारवाई न करता त्यांच्याकडून लाच स्वीकारणे पोलीस नाईकाला महागात पडले आहे. जिल्ह्यातील अहमदपूरमध्ये गुटखा मटेरिअलची विक्रीकरता संबंधिताकडून 2 हजारांची लाच स्वीकारताना पोलीस नाईकाला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. धनंजय गुणाले असे या पोलीस नाईकचे नाव आहे.

अवैध धंद्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येतात. मात्र, जिल्ह्यात अवैध धंद्याला खतपाणी घालणाऱ्या पोलीस शिपाईवरच एसीबीला कारवाई करावी लागली आहे. अहमदपूर येथे धनंजय गुणाले या 36 वर्षीय पोलीस नाईकने पानटपरीमध्ये गुटखा विक्रीकरण्यासाठी संबधिताकडे 2 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. ताजबंद पोलीस चौकीच्या समोरच एसीबीच्या पथकाने गुणाले यांना तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना सोमवारी सायंकाळी रंगेहात पकडले. गुणाले यांनी ज्या चौकीत कर्तव्य बजावले त्या चौकीच्या समोरच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचखोरी प्रकरणात अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लाचलुचपत विभागाच्या पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक माणिक बेद्रे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, कुमार दराडे यांनी ही कारवाई केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.