निलंगा (लातूर) - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब उर्फ अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल फेसबूकच्या माध्यमातून वादग्रस्त लिखाण केलेल्या त्या तरुणाने अखेर माफी मागितली आहे.
निलंगा तालुक्यातील मौजे मसलगा या गावात राहणाऱ्या एका तरुणाने फेसबुकवर प्रकाश आंबेडकरांबाबत वादग्रस्त मजकूर टाकला होता. याबाबत माहिती मिळताच लातूरचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज जोगी यांनी संबंधित तरुण राहत असलेल्या गावातील प्रतिष्ठित नागरिकांशी संपर्क साधला. तेथील पोलीस पाटील, सरपंच व त्या मुलाचे वडिलांना फोनवरून घटनेची माहिती दिली. गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळींनी त्याला गावासमोर बोलावून घेतले व जाब विचारला व घडलेल्या प्रकाराबाबत माफीचा व्हिडिओ तयार करुन माफी मागायला सांगितली.
लातूरच्या सर्व कार्यकर्त्यांनी फेसबुकवर बाळासाहेबांच्या विरोधात पोस्ट पाहिल्यानंतर रात्रभर त्याची माहिती घेऊन सकाळी निलंगा पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना याची माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली, गुन्हा दाखल होण्यापूर्वीच त्याने माफी मागितल्याने होणारी कायदेशीर कारवाई मात्र टळली आहे.
हेही वाचा - लातूरमध्ये 24 तासात 29 कोरोना रुग्णांची भर, तर एकाचा मृत्यू