ETV Bharat / state

विवाहितेची आत्महत्या, सासरच्या जाचाला कंटाळून स्वत:ला संपवल्याचा माहेरच्यांचा आरोप

औराद शहाजानी येथील रहिवासी सुनीता माकणे या विवाहितेने गुरुवारी आत्महत्या केली. ती २ महिन्यांची गर्भवती होती. तिच्याजवळून एक सुसाइड नोटही आढळून आली. यात तिने आजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.

विवाहितेची आजारपणाला कंटाळून आत्महत्या
विवाहितेची आजारपणाला कंटाळून आत्महत्या
author img

By

Published : Feb 28, 2020, 3:21 PM IST

लातूर - निलंगा तालुक्यात विवाहितेने गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. तिच्याजवळून एक सुसाइड नोटही आढळून आली आहे. ती २ महिन्यांची गर्भवती होती, सुनीता बालाजी माकणे असे या महिलेचे नाव आहे. औराद शहाजानी येथील जय भवानी नगरमध्ये ही घटना घडली.

विवाहितेची आजारपणाला कंटाळून आत्महत्या

सुनीताचा ८ महिन्यांपूर्वीच औराद शहाजानी येथील बालाजी माकणे या तरुणाबरोबर विवाह झाला होता. लग्नात मोठ्या प्रमाणात हुंडा आणि सोने देऊन लग्न करून देण्यात आले होते. मात्र, मागील ८ महिन्यांत सातत्याने आणखी हुंड्यासाठी तिला त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळूनच माझ्या मुलीने आत्महत्या केली, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. मात्र, सुनीताजवळ एक सुसाइड नोट आढळून आली असून यामध्ये आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. तर, ४-५ महिन्यांपासूनच्या आजाराला कंटाळून सुनिताने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याचे तिच्या सासरच्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - रेना प्रकल्पातच नागरिकांचा ठिय्या; शेतीसाठी नाही तर पिण्यासाठी पाणी राखुन ठेवण्याची मागणी

सुनीताचा मृतदेह निलंग्याच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. सासरच्या सर्व आरोपींना अटक करूनच शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू करावी, असे सुनीताच्या माहेरकडील लोकांचे म्हणणे आहे. यातील दोषींना जोपर्यंत पोलीस ताब्यात घेत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका नातलगांनी घेतली आहे. सध्या त्यांचे उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे ठिय्या आंदोलन चालू आहे. याप्रकरणी औराद शा. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, औराद शहाजानी पोलीस व निलंगा पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा - लाचेची मागणी करणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.