पुणे - आज (रविवारी) दिवसभरात नव्याने कोरोनाबाधित तब्बल 99 रुग्ण आढळले असून, पुण्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1817 इतका झाला आहे. तर आज दिवसभरात सात कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. पुण्यातील एकूण मृतांचा आकडा 101 वर जाऊन पोहोचला. कोरोनाचीही वाढती आकडेवारी पुणेकरांच्या दृष्टीने चिंता वाढविणारी आहे.
मृतांमध्ये ससून रुग्णालयातील चौघांचा समावेश असून यामध्ये 24 वर्षीय तरुणीचा समावेश आहे. तर खासगी रुग्णालयातील तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पाच महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. तर अजूनही 17 क्रिटीकल रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर गंभीर परिस्थिती असलेले 58 रुग्ण महापालिकेच्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय कोरोनावर यशस्वीरित्या मात केलेल्या 55 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले.
पुण्यात आजवर 1 हजार 817 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून, त्यातील 101 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर उपचारानंतर बऱ्या झालेल्या 433 रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. अजूनही 1 हजार 283 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुणे शहरात आज दिवसभरात कोरोनाचे 99 नवीन रुग्ण, सात बाधितांचा मृत्यू - pune corona update
आज (रविवारी) दिवसभरात नव्याने कोरोनाबाधित तब्बल 99 रुग्ण आढळले असून पुण्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1817 इतका झाला आहे. तर आज दिवसभरात सात कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.
![पुणे शहरात आज दिवसभरात कोरोनाचे 99 नवीन रुग्ण, सात बाधितांचा मृत्यू 99 new covid 19 patients found in pune city](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7048502-1090-7048502-1588528217600.jpg?imwidth=3840)