लातूर - पुण्याहून परत आलेल्या एकाच कुटुंबातील सात सदस्यांची तपासणी करण्यात आली. येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था व सर्वोपचार रुग्णालयात ही चाचणी करण्यात आली होती. या सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकही कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण नसल्याचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले.
पुणे, मुंबई, नागपूर या ठिकाणी कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे आता ग्रामीण भागातही धास्ती निर्माण होऊ लागली आहे. पुणे येथून एकाच कुटुंबातील सात सदस्य दोन दिवसांपूर्वी लातुरात दाखल झाले होते. खबरदारी म्हणून त्यांची प्राथमिक तपासणी लातूर येथील रुग्णालयात करण्यात आली. यासंबंधीचे अहवाल आज प्राप्त झाले असून या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले आहे. जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी एक स्वतंत्र वॉर्ड उभारण्यात आला आहे. रुग्ण आणि संशयितांची संख्या वाढत असल्याने नागरिक स्वतःहून दाखल होत तपासणी करून घेत आहेत. मात्र, संबंधित कुटुंबातील सर्वच सदस्य पुण्याहून परतले होते त्यामुळे अहवाल काय येतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र, शनिवारी सकाळी अहवाल आला आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला.
कोरोनाबद्दल अफवा पसरवू नये. तसेच, घ्यावयाची काळजी यासंदर्भात मनपा आणि जिल्हा प्रशासनाने जनजागृती केली जात आहे.
हेही वाचा - 'कोरोना'ची धास्ती! येरावडा कारागृहातील कैद्यांसाठी तुरुंग प्रशासनाकडून मास्कसह सॅनिटायझर
हेही वाचा - मुलाचे पदवीप्रमाणपत्र खोटे असल्याचे सिद्ध! गोवा उपसभापतींनी तत्काळ पायउतार होण्याची विरोधकांची मागणी