लातूर - महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ साठी आज(9 जानेवारी) मतदान प्रक्रिया पार पडली. येथील नगरसेवकाचे निधन झाल्याने पोटनिवडणुक घेण्यात आली आहे. निवडणुकीत एकुण ४५ टक्के मतदान झाले असून शुक्रवारी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यापूर्वी हा प्रभाग भाजपकडे होता.
हेही वाचा - लातुरात पंचायत समितीमध्ये भाजपचीच सरशी
१९ मतदान केंद्रावर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. काँग्रेस आणि भाजप बरोबरच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासह २ अपक्ष उमेदवार या प्रभागासाठी रिंगणात आहेत. शुक्रवारी सकाळी दहा वाजता मनपाच्या सभागृहात मतमोजणी होणार आहे. या प्रभागात मुख्य लढत काँग्रेस आणि भाजप उमेदवारात राहणार आहे. दरम्यान, भाजप ही जागा स्वतःकडे कायम ठेवते की सत्तांतर होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.