ETV Bharat / state

उदगीरच्या १४९ अडत व्यापाऱ्यांचे परवाने रद्द ; १५० व्यापाऱ्यांवर टांगती तलवार

५ फेब्रुवारी रोजी अंतिम कारणे दाखवा नोटीस देऊनही याकडे कानडोळा करण्यात आला होता. त्यामुळे पणन संचालक पुणे यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व उदगीर असोसिएशन यांना परवाने रद्द करण्यासंदर्भात आदेश दिले होते. शिवाय या व्यापऱ्यांबरोबर व्यवहार करू नये, असेही सांगण्यात आले आहे.

author img

By

Published : May 4, 2019, 12:29 PM IST

कृषी उत्पन्न बाजार समिती

लातूर - गेल्या दोन वर्षांपासून उदगीर येथील तब्बल १४९ अडत व्यापाऱ्यांनी परवान्यांचे नूतनीकरण केले नाहीत. त्यामुळे त्यांचे अडत परवाने रद्द करण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला आहे. शिवाय अजून १५० अडत व्यापाऱ्यांवर या कारवाईची टांगती तलवार असून, त्यांचेही परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

१४९ अडत व्यापाऱ्यांचे पनवाने रद्द करण्यात आले

परवान्यांचे नूतनीकरण करण्याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीने सूचना केल्या होत्या. मात्र, याकडे अडत व्यापाऱ्यांकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास नियमाचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या व्यापाऱ्यांनी २०१७ - १८ आणि २०१८ - १९ या दोन वर्षांचे नूतनीकरण केलेले नाही. यासंदर्भात बाजार समितीने वेळोवेळी सूचना शिवाय नोटीसही बजावली होती.

मात्र,५ फेब्रुवारी रोजी अंतिम कारणे दाखवा नोटीस देऊनही याकडे कानडोळा करण्यात आला होता. त्यामुळे पणन संचालक पुणे यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व उदगीर असोसिएशन यांना परवाने रद्द करण्यासंदर्भात आदेश दिले होते. शिवाय या व्यापऱ्यांबरोबर व्यवहार करू नये, असेही सांगण्यात आले आहे. पाहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई झाली असून, उर्वरित १५० व्यापाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार आहे.

Intro:उदगीरच्या 149 अडत व्यापाऱ्यांचे परवाने रद्द ; 150 व्यापाऱ्यांवर टांगती तलवार
लातुर : गेल्या दोन वर्षापासून उदगीर येथील तब्बल 149 अडत व्यापाऱ्यांनी परवान्यांचे नूतनीकरण केले नसल्याने त्यांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला आहे. शिवाय अजून 150 अडत व्यापाऱ्यांवर या कारवाईची टांगती तलवार असून त्यांचेही परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Body:परवान्यांचे नूतनीकरण करण्याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीने सूचना केल्या होत्या. मात्र, याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी- विक्री विकास नियमाचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या व्यापाऱ्यांनी 2017-18 आणि 2018-19 या दोन वर्षाचे नूतनीकरण केलेले नाही. यासंदर्भात बाजार समितीने वेळोवेळी सूचना शिवाय नोटीसही बजावली होती. मात्र 5 फेब्रुवारी रोजी अंतिम कारणे दाखवा नोटीस देऊनही याकडे कानडोळा करण्यात आला होता. त्यामुळे पणन संचालक पुणे यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व उदगीर असोसिएशन यांना परवाने रद्द करण्यासंदर्भात आदेश दिले होते. शिवाय या व्यापऱ्यां बरोबर व्यवहार करू नये असेही सांगण्यात आले आहे. Conclusion:पाहिल्यादाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई झाली असून उर्वरित 150 व्यापाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.