ETV Bharat / state

लातूरवरील पाणीटंचाईचे सावट दूर; 4 दिवसात मांजरामध्ये ११ दलघमी पाणीसाठा

author img

By

Published : Oct 23, 2019, 4:04 AM IST

गेल्या चार दिवसांमध्ये मांजरा धरणात ११ दलघमी पाणीसाठा झाला असून सध्याही पाण्याची आवक सुरूच आहे. ही बाब लातूरकरांसह अंबाजोगाई, कळंब, केज येथी नागरिकांना दिलासा देणारी आहे.

लातूरवरील पाणीटंचाईचे सावट दूर

लातूर - भर पावसाळ्यात लातुरकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. शिवाय पावसाळा अखेरच्या टप्प्यात असतानाही पावसाने हुलकावणी दिल्याने पुन्हा रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागणार अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, परतीच्या पावसाने लातूरकरांना दिलासा दिला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये मांजरा धरणात ११ दलघमी पाणीसाठा झाला असून सध्याही पाण्याची आवक सुरूच आहे.

ही बाब लातूरकरांसह अंबाजोगाई, कळंब, केज येथी नागरिकांना दिलासा देणारी आहे. लातूर शहराला सध्या १५ दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. शिवाय १ नोव्हेंबरपासून १५ दिवसाला येणारे पाणी महिन्यातून एकदा येणार होते. तसे जिल्हा प्रशासनाकडून नियोजनही करण्यात आले होते. मात्र, परतीच्या पावसाने मोठा दिलासा दिला असून मार्च अखेरपर्यंत सध्याच्याप्रमाणेच पाणीपुरवठा होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

लातूरवरील पाणीटंचाईचे सावट दूर

१ ऑक्टोबरपासून येथील एमआयडीसी भागातील पाणी पुरवठाही बंद करण्यात आला होता. मांजरा धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने दोन दिवसापासून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. ८ दिवसांपूर्वी मांजरा धरणात केवळ ४ दलघमी पाणी होते. मात्र चार दिवसांमध्ये येथील चित्र बदलले असून धरणात सध्या ११ दलघमी पाणी साठले आहे. अद्यापही धरणात पाणी साठत असून दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्यासह रब्बी हंगामासाठीही या परतीच्या पावसाचा मोठा आधार मिळणार आहे.

Intro:लातूरकरांवरील पाणीटंचाईचे सावट दूर ; चार दिवसांमध्ये मांजरामध्ये ११ दलघमी पाणीसाठा
लातूर : भर पावसाळ्यात लातूरकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. शिवाय पावसाळा अखेरच्या टप्प्यात असतानाही पावसाने हुलकावणी लातूरकरांना पुन्हा रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागणार अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, परतीच्या पावसाने लातूरकरांना दिलासा दिला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये मांजरा धरणात ११ दलघमी पाणीसाठा झाला असून सध्याही पाण्याची आवक सुरूच आहे. ही बाब लातूरकरांसह अंबाजोगाई, कळंब, केज येथी नागरिकांना दिलासा देणारी आहे.Body:लातूर शहराला सध्या १५ दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. शिवाय १ नोव्हेंबर पासून १५ दिवसाला येणारे पाणी महिन्यातून एकदा येणार होते. तसे जिल्हा प्रशासनाकडून नियोजनही करण्यात आले होते. मात्र, परतीच्या पावसाने मोठा दिलासा दिला असून मार्च अखेरपर्यंत सध्याच्या प्रमाणे पाणीपुरवठा होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. १ ऑक्टोबर पासून येथी एमआयडीसी भागातील पाणीपुरवठाही बंद करण्यात आला होता. मांजरा धारण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने दोन दिवसापासून पाणीपुरवठा पूर्ववद करण्यात आला आहे. ८ दिवसांपूर्वी मांजरा धरणात केवळ ४ दलघमी पाणी होते. मात्र चार दिवसांमध्ये येथील चित्र बदलले असून धरणात सध्या ११ दलघमी पाणी साठले आहे. अद्यापही धरणात पाणी साठत असून दोन दिवस पावसाचा अंदाज वार्तिवण्यात आला आला आहे. पावसाळा कोरडाठाक गेला असला तरी परतीच्या पावसाने लातूरकरांना दिलासा दिला आहे. Conclusion:पिण्याच्या पाण्यासह रब्बी हंगामासाठीही या परतीच्या पावसाचा मोठा आधार मिळणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.