पुणे Electric Shock Death : प्रेषित महंमद पैगंबर जयंती 16 सप्टेंबर रोजी होती. तर 17 तारखेला गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) होते. त्यामुळं 21 सप्टेंबर रोजी पुण्यात जुलूस मिरवणूक (Eid E Milad Julus) काढण्याचा निर्णय 'सिरत कमिटी'च्या वतीनं घेण्यात आला होता. या मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली.
विजेच्या तारेचा लागला झटका : मिळालेल्या माहितीनुसार, जुलूस मिरवणूक वडगाव शेरीतील आनंद पार्क येथून जात होती. काही युवक हातात झेंडा घेऊन डॉल्बीच्या गाण्यावरती नाचत होते. त्यातील दोन युवक झेंडा फडकत असताना एकाचा झेंडा विजेच्या तारेला चिटकला आणि त्याला विजेचा झटका लागला. यात एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा जखमी झाला. जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डीजेमुक्त पैगंबर जयंती : यंदाची प्रेषित महंमद पैगंबर जयंतीची मिरवणूक ही डीजेमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे यंदा डीजेमुक्त जुलूस काढण्यात आले. परंतु, दुपारी काही मंडळांकडून डीजेवर मिरवणूक करण्यात आली होती. त्यावेळी आनंद पार्कजवळ जुलूस मिरवणुकीत ही घटना घडली. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विजेच्या धक्क्यानं मृत्यू : या आधीही अशीच एक घटना घडली होती. दौंड तालुक्यातील दापोडी येथे विजेचा धक्का लागून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. हे कुटुंब पत्र्याच्या खोलीत राहत होतं. शेजारीच असलेल्या विजेच्या खांबामुळं त्यांना विजेचा धक्का बसला होता.
हेही वाचा -