ETV Bharat / state

Gram Panchayat Result: शिरोळमध्ये यड्रावकरांचाच दबदबा! 17 पैकी 10 सरपंच - Congress is victorious in many Gram Panchayats

शिरोळ तालुक्यामध्ये 17 ग्रामपंचायतचे निकाल जाहीर झाले. एकूण निकाल पाहता राजेंद्र पाटील यड्रावकर गटाने तालुक्यात आपला राजकीय दबदबा कायम राखला आहे. (Gram Panchayat Result) काही गावांमध्ये स्थानिक आघाड्यांशी युती करत 17 पैकी 10 ठिकाणी सरपंच निवडून आणण्यात यश मिळवलं आहे. बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर काही गावांमध्ये यड्रावकर गटाला घेरण्याचा प्रयत्न झाला, पण यड्रावकर गटाच्या समर्थकांनी चिवट झुंज देत विजय खेचून आणला आहे.

राजेंद्र पाटील यड्रावकर
राजेंद्र पाटील यड्रावकर
author img

By

Published : Dec 20, 2022, 10:21 PM IST

कोल्हापूर - एकूण निकाल पाहता राजेंद्र पाटील यड्रावकर गटाने तालुक्यात आपला राजकीय दबदबा कायम राखला आहे. काही गावांमध्ये स्थानिक आघाड्यांशी युती करत 17 पैकी 10 ठिकाणी सरपंच निवडून आणण्यात यश मिळवलं आहे.

असा आहे निकाल - यड्रावकर गटासाठी ग्रामपंचायतीच्या या निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरल्या होत्या. शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट, अकिवाट, कवठेसार, उमळवाड, औरवाड, नवे दानवाड, कनवाड, संभाजीपुर, हेरवाड आणि चिंचवाड या गावांमध्ये यड्रावकर गट आणि स्थानिक आघाडीचे सरपंच निवडून आले, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाला मिळालेल्या या यशामुळे यड्रावकर गटामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर येथे असलेल्या माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील सर्व विजयी नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन केले आहे. तर दुसऱ्या बाजूला हातकणंगले तालुक्यातील रूकडी गावात शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांच्या चुलत भावाचा पराभव झाला आहे.माजी उपसरपंच मोहन माने यांचा पराभव झाला असून धैर्यशील माने याचा पॅनल मात्र येथे जिंकला आहे. या गावात स्वतः धैर्यशील माने हे मतदानासाठी गेले होते

कोल्हापूर जिल्हा सरपंच आणि ग्रामपंचायत निकाल

  • भाजप - 82
  • राष्ट्रवादी - 75
  • शिंदे गट - 40
  • ठाकरे गट - 39
  • काँग्रेस - 47
  • इतर - 42
  • एकूण- 429/325 (104)

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.