ETV Bharat / state

Ambabai Temple : अंबाबाई मंदिरात आढळला 'जुना ठेवा'; जुन्या फरशी काढताना उलगडा - restoring Ambabai Temple in original stone form

कोल्हापूरातील अंबाबाई मंदिरात ( Kolhapur Ambabai Temple ) बाराव्या शतकातील यादवकालीन शिलालेख आढळला आहे. मंदिरातील संगमरवरी फरशी काढून मंदिराला मूळ दगडी रुपात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू ( Yadava period inscription found ) आहे.

Ambabai Temple
अंबाबाई मंदिर
author img

By

Published : Nov 2, 2022, 12:24 PM IST

कोल्हापूर : कोल्हापूरातील अंबाबाई मंदिरात ( Kolhapur Ambabai Temple ) बाराव्या शतकातील यादवकालीन शिलालेख आढळला आहे. मंदिरातील संगमरवरी फरशी काढून मंदिराला मूळ दगडी रुपात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू ( Yadava period inscription found ) आहे. याच दरम्यान संस्कृत भाषेतील यादवकालीन शिलालेख आढळल्याची माहिती देवस्थान समितीने दिली आहे. सरस्वती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाच्या पूर्व भिंतीत हा शिलालेख आडवा आढळला आहे.

यादवकालीन शिलालेख आढळला

काय आहे या शिलालेखाचे वैशिष्ट्ये ? : संस्कृत भाषा, देवनागरी लिपी, सोळा ओळी, गद्धेगाळी शिलालेख, आकार साधारण 2 फूट लांब व 1 फूट रुंद, मूळ मंदिराचा भाग असलेला व नंतर दगडी बांधकामात आडवा दगड म्हणून याचा भिंतीकरिता वापर केला आहे. सरस्वती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाच्या पूर्व भिंतीत हा शिलालेख आडवा आहे. मंदिरातील संगमरवरी फरशी काढण्यासाठी सुरू केलेल्या संर्वधन प्रकल्पात हा शिलालेख उजेडात आला ( restoring Ambabai Temple in original stone form ) आहे. देवस्थान समिती या शिलालेखाचे भाषांतर झाल्यावर सविस्तर माहिती देणार आहे. श्री करवीर निवासीनी अंबाबाई मंदिरातील इतिहासात आणखीन एक मौल्यवान भर पडली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.