ETV Bharat / state

खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कारापासून वंचित ठेवणारे केंद्र आणि राज्य सरकारच

author img

By

Published : Jan 31, 2021, 10:45 PM IST

खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार न मिळण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार आहे, अशी भावना आजच्या मल्लविद्या कुस्ती महासंघाच्या राज्य मेळाव्यात उमटली. हा मेळावा कोल्हापुरात आंबेवाडी येथे दत्त सभागृहात पार पडला. यावेळी महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी विजेत्या मल्लांनी उपस्थिती लावली होती.

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर - भारताचे पहिले ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार न मिळण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार आहे, अशी भावना आजच्या मल्लविद्या कुस्ती महासंघाच्या राज्य मेळाव्यात उमटली. हा मेळावा कोल्हापुरात आंबेवाडी येथे दत्त सभागृहात पार पडला. यावेळी महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी विजेत्या मल्लांनी उपस्थिती लावली होती.

कोल्हापूर

कुस्ती मल्लविद्या महासंघाने कुस्ती प्रसाराचे कौतुकास्पद काम हाती घेतले आहे. त्यांच्या खांद्याला-खांदा लावून कुस्ती राज्यातील घरा-घरात पोहचविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे, असे प्रतिपादन अर्जुनवीर पैलवान काका पवार यांनी केले. ते कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या राज्यव्यापी मेळाव्यात रविवारी दुपारी बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन दीप प्रज्वलन आणि महाबली हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.

पैलवानांच्या उपचारांसाठीही महासंघाने पुढाकार घेतला

काका पवार म्हणाले, महासंघातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून कुस्ती प्रसाराचे काम सुरू आहे. गणेश मानुगडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कुस्ती जगभरात पोहचविली. महासंघाचे संस्थापक गणेश मानुगडे यांनी महासंघाच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच भविष्यातील दिशा स्पष्ट केली. मुख्य प्रवक्ता संग्राम कांबळे म्हणाले, कुस्तीच्या प्रसार आणि प्रचाराची ही चळवळ आहे. त्यातून अनेक पैलवान घडत आहेत. तर पैलवानांच्या उपचारांसाठीही महासंघाने पुढाकार घेतला आहे.

दिग्गज मल्ल उपस्थित

मेळाव्यास अर्जुनवीर मल्ल पोलीस उपअधीक्षक राहुल आवारे, ऑलिंपिककवीर बंडा पाटील, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, महाराष्ट्र केसरी संभाजी पाटील, महान महाराष्ट्र केसरी दिलीप भरणे, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, हिंदकेसरी संतोष वेताळ, वैभव लांडगे, पृथ्वीराज पवार, खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजित जाधव, सोनबा गोंगाणे, महिला आघाडीच्या रिमा शेळके, अनिता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आनंदराव पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.