ETV Bharat / state

Kolhapur Thief Caught By Judge : 'तो' चोरत होता महिलांची अंतर्वस्त्रे; न्यायाधिशांनीच रचला सापळा अन् - कोल्हापूरात न्यायाधीशांनी चोराला पकडले

भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथे एकास महिलांची अंतर्वस्त्रे चोरताना पकडले ( Kolhapur Women Underwear Thief ) आहे. येथील न्यायाधीशांनी सापळ रचुन या चोरास रंगेहाथ पकडले ( Kolhapur Thief Caught By Judge ) आहे. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Kolhapur Thief Caught By Judge
Kolhapur Thief Caught By Judge
author img

By

Published : Jan 19, 2022, 1:32 AM IST

कोल्हापूर - कोल्हापूर मधील भुदरगड तालुक्यातील गारगोटी मध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांची अंतर्वस्त्रे चोरीस जात ( Kolhapur Women Underwear Thief ) असल्याचा प्रकार घडत होता. येथील एका न्यायाधीशांच्या घराबाहेरील वाळत घातलेली कपडे चोरल्याच्याही घटना घडल्या. याबाबत न्यायाधीशांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, चोर काही सापडला नाही. अखेर न्यायाधीशांनीच सापळा रचला आणि या अंतर्वस्त्र चोरास रंगेहाथ पकडण्यात ( Kolhapur Thief Caught By Judge ) आले. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सुशांत सदाशिव चव्हाण, (वय 35, रा.सोळांकूर, ता. राधानगरी, सध्या रा.सोनाळी-गारगोटी) असे या चोराचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून गारगोटी परिसरातील महिलांची अंतर्वस्त्रे अन्य कपडे चोरीस जात होती. याच परिसरात राहणाऱ्या न्यायाधीशांच्याच घराबाहेर अशा घटना घडल्या होत्या. त्याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली होती. पण, पोलिसांना तो चोर काही हाती लागेना. शेवची न्यायाधिश आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचुन आठ दिवस पहारा ठेवला.

चोरी करतानाचा सीसीटीव्ही व्हिडीओ

अन् चोर रंगेहाथ सापडला

सोमवारी पहाटेच्या सुमारास या चोराने न्यायालयाकडील भिंत पडलेल्या बाजुने प्रवेश केला. त्याने थेट घराच्या बाहेर वाळत घातलेल्या कपड्यांकडे मोर्चा वळवला. बाहेर वाळत घातलेली कपडे, महिलांची आंतरवस्त्रे, चप्पल, बुट घेऊन पळण्याचा प्रयत्न करत असतान दबा धरुन बसलेल्या न्यायधिशांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोरास रंगेहात पकडले. सुशांत सदाशिव चव्हाण असे त्याचे नाव असून, गारगोटी न्यायालय कर्मचारी रंगराव हरी चांदम यांनी दिलेल्या फिर्यादवरुन त्याच्यावर गुन्हा ( Police Register Fir Thief ) दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर यांच्या पथक पुढलील तपास करत आहे.

चोर एका खाजगी दवाखान्यात नोकरीस

गारगोटी येथील स्टँड परिसरातील एका प्रसिद्ध खाजगी दवाखान्यात हा चोर नोकरीस आहे. कमी दरात हा घरी रुग्णांवर उपचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या अंतर्वस्त्रे चोराची गारगोटीसह परिसरात खुमासदार चर्चा आहे.

हेही वाचा - 'शाहिस्तेखानाची बोटही महाराष्ट्रात छाटली गेली होती; त्यामुळे तुमचा..'; पटोलेंवर टीका करताना अनिल बोंडेंची जीभ घसरली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.