पन्हाळा (कोल्हापूर) : मागील 2 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उघडीप घेतली आहे. त्यामुळे शेतीच्या आंतरमशागतींच्या कामांना वेग आला आहे. कोळपणी, भांगलणी यासारखी आंतरमशागतींची कामे सर्वत्र सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे.
पन्हाळ्याच्या पायथ्याला वसलेल्या तुरूकवाडी गावात सुद्धा महिला भांगलनीच्या कामात व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले. ही काम करीत असताना आजही ग्रामीण भागातील महिला ओव्या गात शेतातील कामे अगदी आनंदाने उरकून घेत असतात.
हेही वाचा... 'सोयाबीन बियाणे बोगसगिरी प्रकरणी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ देणार नाही'
हवामान खात्याने यावर्षी देखील कोल्हापूर जिल्ह्यात चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात भात, भुईमूग, नाचणी, ज्वारी, सोयाबीन आदी पिकांची पेरणी केली आहे. पेरणीनंतर जिल्ह्यात सर्वत्र मोठा पाऊस झाल्याने बळीराजा सुद्धा सुखावला. त्यात आता पावसाने उघडीप दिल्याने भांगलन, कोळपणी यासारखी आंतरमशागतीची कामे शेतकरी उरकून घेत आहेत.