ETV Bharat / state

राधानगरी धरणातून विसर्ग बंद; अफवांवर विश्वास ठेवू नये - कार्यकारी अभियंता बांदिवडेकर

जिल्ह्यातील राधानगरी धरणात सध्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धरणाच्या विद्युत विमोचकातून सकाळी 800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र, तो आता बंद करण्यात आला आहे.

राधानगरी धरणातून विसर्ग बंद
राधानगरी धरणातून विसर्ग बंद
author img

By

Published : Jun 3, 2020, 7:36 AM IST

कोल्हापूर - राधानगरी धरणामधून होणारा 800 क्युसेकचा विसर्ग आज सकाळी 8 वाजता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांची तपासणी झाली असून तांत्रिकदृष्ट्या ती मजबूत आहेत. समाज माध्यमांवर फिरणाऱ्या कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. प्रशासन पूर्ण क्षमतेने दक्ष असल्याचेही बांदिवडेकर यांनी म्हटले.

दरम्यान, जिल्ह्यातील राधानगरी धरणात सद्या 38.95 दलघमी इतका पाणीसाठा आहे. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धरणाच्या विद्युत विमोचकातून सकाळी 800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र, तो आता बंद करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमध्ये असलेल्या पाणीसाठ्यावर एक नजर:

तुळशी 46.66 दलघमी
वारणा 324.35 दलघमी
दूधगंगा 212.58 दलघमी
कासारी 21.38 दलघमी
कडवी 30.20 दलघमी
कुंभी 27.05 दलघमी
पाटगाव 22.70 दलघमी
चिकोत्रा 13.87 दलघमी
चित्री 13.05 दलघमी
जंगमहट्टी 9.21 दलघमी
घटप्रभा 14.56 दलघमी
जांबरे 6.06 दलघमी
कोदे (ल पा) 1.380 दलघमी असा आहे.

महत्त्वाच्या बंधाऱ्यांच्या पाणी पातळीवर एक नजर :
राजाराम 11.8 फूट
सुर्वे 12.6 फूट
रुई 38 फूट
तेरवाड 32 फूट
शिरोळ 26.3 फूट
नृसिंहवाडी 18 फूट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.