ETV Bharat / state

कोल्हापुरातील 'या' ६० गावांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार..?

गगनबावडा पन्हाळा आणि राधानगरी तालुक्यातील ६० हून अधिक गावं आजही तहानलेली आहेत. त्यामुळेच येथील गावकऱ्यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. विशेष म्हणजे सगळ्या ग्रामपंचायतींनी तसा ठराव केला.

कोल्हापुरातील ६० गावांचा निवडणुकीवर बहिष्कार
author img

By

Published : Apr 10, 2019, 2:06 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण पाहता येथे ओला दुष्काळ जाहीर करावा लागतो. एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात पाणीदार जिल्हा अशी कोल्हापूर जिल्ह्याची ओळख असताना, याच जिल्ह्यात पाण्यासाठी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे.

कोल्हापुरातील ६० गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

राज्यात कुठेही दुष्काळ पडला तरी कोल्हापूर जिल्ह्यात मात्र मुबलक पाणी असते. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील धामणी मध्यम प्रकल्प गेल्या १८ वर्षांपासून रखडला आहे. १९९६ मध्ये मंजुरी मिळालेल्या या प्रकल्पाच्या कामाला २००० मध्ये सुरुवात झाली. मात्र त्यानंतर आजपर्यंत हे काम पूर्ण झालेलं नाही.
गगनबावडा पन्हाळा आणि राधानगरी तालुक्यातील ६० हून अधिक गावं आजही तहानलेली आहेत. त्यामुळेच येथील गावकऱ्यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. विशेष म्हणजे सगळ्या ग्रामपंचायतींनी तसा ठराव केला.

ज्यावेळी धामणी मध्यम प्रकल्प मंजूर करण्यात आला, त्या वेळेला त्याची किंमत होती १२० कोटी रुपये हेती. आत्ताची किंमत तब्बल ७८२ कोटी रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे या धामणी मध्यम प्रकल्पाबाबतच जे पुनर्वसन होते तेही पूर्ण झाले आहे. ३.८५ टीएमसी इतकी क्षमता असलेल्या या प्रकल्पामुळे ५० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली जाणार आहे. तसेच ३.८५ टीएमसी पैकी २ टीएमसी पाणीसाठा हा कोल्हापूर शहराला वितरित करण्यात येण्याची तरतूदही या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तरीही लोकप्रतिनिधी त्याकडे लक्ष देत नाहीत आणि त्यामुळेच धामणी मध्यम प्रकल्प भागातल्या तब्बल ६० गाव, वाड्या-वस्त्या आणि त्या गावांमधल्या ३० हजार मतदारांनी येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला.

येत्या २३ तारखेला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे, मात्र या दिवशी सगळी मतदान केंद्र ओस पडतील असा येथील शेतकऱ्यांचा दावा आहे. तसंच कुठल्याही राजकीय पक्षाला आणि नेत्याला गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यापूर्वीही जिल्हाधिकारी यांच्यापासून पंतप्रधानांनाही निवेदन पाठवण्यात आली मात्र त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. म्हणूनच धामणी मध्यम प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या म्हासुरलीसह तब्बल ६० गावांतील गावकऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीत मतदानाला जाणार नाही असा निर्णय घेतला आहे.

Intro:अँकर- कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात इतका भयानक पाऊस पडतो की इथ ओला दुष्काळ जाहीर करावा लागतो... अगदी हा भाग म्हणजे जणू महाराष्ट्रच चेरापुंजीच म्हणा की.... एककीकडे संपूर्ण महाराष्ट्रात पाणीदार जिल्हा अशी कोल्हापूर जिल्ह्याची ओळख असताना पण याच जिल्ह्यात पाण्यासाठी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे...होय.. आश्चर्य वाटून घेऊ नका पण ही बाब खरी आहे...पाहूयात कोल्हापूर जिल्ह्यातला एक स्पेशल रिपोर्ट...Body:व्हीओ १ : राज्यात कुठे जरी दुष्काळ पडला तरी कोल्हापूर जिल्ह्यात मात्र मुबलक पाणी असतं... मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील धामणी मध्यम प्रकल्प गेल्या अठरा वर्षांपासून रखडला आहे..1996 साली मंजुरी मिळालेल्या या प्रकल्पाच्या कामाला 2 हजार साली सुरुवात झाली खरी... मात्र त्यानंतर आजपर्यंत हे काम पूर्ण झालेलं नाहीय.. 2 वर्ष कामाला सुरुवात झाली आणि नंतर काम बंद पडले... परिणामी गगनबावडा पन्हाळा आणि राधानगरी तालुक्यातील 60 हुन अधिक गावं आजही तहानलेली आहेत आणि त्यामुळेच इथल्या गावकऱ्यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातलाय विशेष म्हणजे सगळ्या ग्रामपंचायतींनी तसा ठराव केलाय.. त्यांच्यावर ही वेळ का आली ऐकूयात त्यांच्याच तोंडून..

Byte - सर्जेराव पाटील, शेतकरी म्हासुरली

व्हीओ २ - ज्यावेळी धामणी मध्यम प्रकल्प मंजूर करण्यात आला त्या वेळेला त्याची किंमत होती 120 कोटी रुपये आणि आत्ताची किंमत झालेय तब्बल 782 कोटी रुपये.. विशेष म्हणजे या धामणी मध्यम प्रकल्पाबाबतच जे पुनर्वसन होतं तेही पूर्ण झालेल आहे.. 3.85 टीएमसी इतकी क्षमता असलेल्या या प्रकल्पामुळे 50 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली जाणार आहे.. तसेच 3.85 टीएमसी पैकी 2 टीएमसी पाणीसाठा हा कोल्हापूर शहराला वितरित करण्यात येण्याची तरतूदही या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.. तरीही लोकप्रतिनिधी त्याकडे लक्ष देत नाहीत आणि त्यामुळेच धामणी मध्यम प्रकल्प भागातल्या तब्बल 60 गाव , वाड्या-वस्त्या आणि त्या गावांमधल्या 30 हजार मतदारांनी येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय काय आहेत त्यांच्या अडचणी पाहुयात..

Byte -रामदास चौगले, शेतकरी

व्हीओ ३ - येत्या 23 तारखेला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे मात्र या दिवशी सगळी मतदान केंद्र ओस पडतील असा इथल्या शेतकऱ्यांचा दावा आहे....तसंच कुठल्याही राजकीय पक्षाला आणि नेत्याला गावात प्रवेशबंदी करण्यात आलीय..यापूर्वीही जिल्हाधिकारी यांच्यापासून पंतप्रधानांनाही निवेदन पाठवण्यात आली मात्र त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही म्हणूनच धामणी मध्यम प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या म्हासुरलीसह तब्बल 60 गावांनी हा बहिष्कार घातलाय आणि कुठल्याही परिस्थितीत मतदानाला जाणार नाही असाही इथल्या शेतकऱ्यांनी इरादा केला आहे..

Byte -अण्णासो शिंदे , शेतकरी
Byte - सर्जेराव पाटील, शेतकरी म्हासुरली

व्हीओ ४ - सरकारी काम आणि बारा महिने थांब अशी एक म्हण प्रचलित आहे मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील हे काम 12 महिने थांबले नाहीय तर तब्बल 18 वर्षे थांबलेय याला जबाबदार कोण ? पन्हाळा राधानगरी गगनबावडा हे तिन्ही तालुके सधन समजले जातात मात्र धामणी मध्यम प्रकल्प रखडल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचे जगणं आता मुश्कील झाले आहे, त्यांच्याकडे मायबाप सरकार लक्ष देणार का आणि त्यांना मतदानाचा अधिकार बजावता येणार का हाच खरा प्रश्न आहे...

End p2cConclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.