ETV Bharat / state

व्हिडिओ : चिमुकली शाळेला जायला झाली आतुर - लहान मुले

सध्या एका चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात चिमुकली पहिल्या दिवशी शाळेला जाण्यासाठी किती आतुर आणि उत्साही झाली आहे, हे दिसून येत आहे.

चिमुकली शाळेला जायला झाली आतुर
author img

By

Published : Jun 17, 2019, 12:12 PM IST

कोल्हापूर - उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर आज सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरू झाले आहेत. शाळेला जायचे म्हटले, की लहान मुलांचे रडणे सुरूच असते. परंतु, सध्या एका चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात चिमुकली पहिल्या दिवशी शाळेला जाण्यासाठी किती आतुर आणि उत्साही झाली आहे, हे दिसून येत आहे.

चिमुकली शाळेला जायला झाली आतुर, पाहा व्हिडिओ

आपल्या आई-वडिलांना सोडून शाळेत जाताना हमखास लहान मुलांच्या तोंडावर बारा वाजलेले असतात. पण एक चिमुकली पहिल्या दिवशी शाळेत जाण्यासाठी उत्साही असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आराध्या असे या चिमुकलीचे नाव आहे. शाळेला जाण्यासाठी आई-वडिलांनी नवनवीन वस्तू आणून दिल्यानंतर तिला झालेला आनंद या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे.

दरम्यान, आजपासून राज्यातील जिल्हापरिषद, मनपा, नगरपालिका, खाजगी अनुदानित, विनाअनुदानितसह तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू होत आहेत. त्यासाठी अनेक शाळांनी या नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारीसुद्धा चांगल्या पद्धतीने केली आहे.

Intro:अँकर : शाळेला जायचं म्हंटल की लहान मुलांची रड सुरूच.. आपल्या आई वडिलांना सोडून शाळेत जाताना हमखास त्यांच्या तोंडावर बारा वाजलेले असतात. पण एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे की, एका चिमुकलीचा शाळेचा आजचा पहिला दिवस आणि शाळेला जाण्यासाठी ती किती आतुर आणि उत्साही झालीये हे दिसून येत आहे. शाळेला जाण्यासाठी आई-वडिलांनी नवीन नवीन वस्तू आणून दिल्यानंतर तिला झालेला आनंद या व्हिडिओतून पाहायला मिळतोय. आराध्या असं या चिमुकलीचं नाव आहे. दरम्यान, आजपासून जिल्हापरिषद, मनपा, नपा, खाजगी अनुदानित, विनाअनुदानितसह इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू होत आहेत. त्यासाठी अनेक शाळांनी या नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी सुद्धा चांगल्या पद्धतीने केली आहे.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.