कोल्हापूर - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात चोरट्यांनी चंदनाचे झाड तोडल्याची घटना घडली आहे. सीसीटीव्ही आणि सुरक्षारक्षक असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच चोरट्यांनी चंदनाचे झाड तोडल्यामुळे नागरिकांतून आश्चर्य व्यक केले जात आहे.
'झाडे लावा झाडे जगवा' असा संदेश सरकारर्फे दिला जातो. यासाठी दरवर्षी कोटींच्या संख्येत वृक्ष लागवड करण्याचा योजनाही राबविल्या जातात. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच बेकायदेशीर वृक्षतोड होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात चोख बंदोबस्त आहे. हा परिसर सीसीटीव्हीच्या देखरेखीत आहेत. तरीसुद्धा चंदनाचे झाड तोडल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.