ETV Bharat / state

ठाकरेंच्या मंत्रीमंडळाला कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही; राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा - चंद्रकांत पाटील

author img

By

Published : Nov 2, 2021, 7:35 PM IST

Updated : Nov 2, 2021, 8:31 PM IST

आज सर्वसामान्य माणसाला विश्वास वाटला आहे की, कायद्यापुढे सगळे समान आहेत. एकूणच 2014साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून झिरो टॉलरन्स नावाचा त्यांनी शब्द वापरला आहे. तो म्हणजे मै खाऊंगा नही और किसी को खाने दुंगा नही. मग तो कोणत्याही पक्षाचा असेल. आमच्या भाजपचा सुद्धा असला तरी अशी चूक करून भ्रष्टाचार केला, गुन्हा केला तर कोणाचीही सुटका नाही.

chandrakant patil
चंद्रकांत पाटील

कोल्हापूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या मंत्रीमंडळाला आता कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही. यातील अनेकजण आता सुपात आहेत तर काहीजण जात्यात आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाने राजीरामा दिला पाहिजे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. आम्ही सत्तेसाठी हे म्हणत नाही. मात्र, सर्वसामान्य लोकसुद्धा आता म्हणत असतील की ज्यांच्याकडून आम्ही सुरक्षेची अपेक्षा करत असतो तेच गृहमंत्री तुरुंगात जात असतील तर काय बोलणार? त्यांनी नैतिकता असेल तर राजीनामा देऊन पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरे जावे, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी हल्लाबोल केला. अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पत्रकार परिषदेत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

कायद्यासमोर सर्व सामान; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 1200 कोटींची प्रॉपर्टी सील -

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आज सर्वसामान्य माणसाला विश्वास वाटला आहे की, कायद्यापुढे सगळे समान आहेत. एकूणच 2014साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून झिरो टॉलरन्स नावाचा त्यांनी शब्द वापरला आहे. तो म्हणजे मै खाऊंगा नही और किसी को खाने दुंगा नही. मग तो कोणत्याही पक्षाचा असेल. आमच्या भाजपचा सुद्धा असला तरी अशी चूक करून भ्रष्टाचार केला, गुन्हा केला तर कोणाचीही सुटका नाही, असा इशारा दिला. त्यानुसार सर्वसामान्य माणसांना मोदी यांच्याबाबतचा आदर वाढला आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संबंधीतसुद्धा जवळपास 1200 कोटींची प्रॉपर्टी सील केली असल्याची माहिती मिळत असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांना आता परवानगी शिवाय ही प्रॉपर्टी विकता येणार नाही. त्यामुळे अशा सहकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्य चालविण्याचा अधिकार नसल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगात, 6 नोव्हेंबरपर्यंत 'ईडी' कोठडी

अजूनही विधानपरिषदेच्या जागांबाबत हालचाल नाहीये -

कोल्हापूरात विधानपरिषदेसाठी विरोधकांकडे भक्कम उमेदवार नाही त्यामुळे सतेज पाटील यांच्यासाठी निवडणूक एकतर्फी आहे, असे विधान ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकतेच म्हटले होते. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले. आमच्याकडे स्ट्रॉंग उमेदवार आहे किंव्हा नाही याबाबत आमच्या घरात डोकावण्याचे काहीही कारण नाही. तुम्ही आपले आपले बघा, असेही त्यांनी म्हणत त्यांना टोला लगावला. जेव्हा केव्हा निवडणुका जाहीर होतील तेंव्हा भाजप आपला पत्ता ओपन करेल असेही त्यांनी म्हटले.

पेट्रोल डिझेल जीएसटीमध्ये आणण्यासाठी अजित पवारांचा विरोध -

महागाईबाबत प्रश्न विचारल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत यावा यासाठी आग्रही होतो. मात्र, याला अजित पवार यांनीच विरोध केला आहे. जर जीएसटीच्या कक्षेत आले तर तब्बल 30 ते 35 रुपयांपर्यंत इंधन दर कमी येतील, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

Last Updated : Nov 2, 2021, 8:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.