कोल्हापूर : जगात भारी अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात नेहमीच काहीतरी खास पाहायला मिळत असते. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. कारण एका तरुणाने आपल्या दुचाकीचे ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक ( two-wheeled procession ) काढून स्वागत केले आहे. गाडीची किंमत सुद्धा लाखाच्या घरात आहे. कोण आहे हा तरुण, काशपद्धतीने त्याने आपल्या या नव्या दुचाकीचे स्वागत ( Two wheelers welcomed in Kolhapur ) केले आहे पाहूयात.
कावासाकी निंजा झेडएक्स 10 आर गाडीची कोल्हापूरात हवा : दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर अनेकजण आपल्या घरात नवीन गाडी, टीव्ही आदी वस्तू खरेदी करत असतात. कोल्हापूरातील कळंबा येथे राहणाऱ्या राजेश चौगले या तरुणाने सुद्धा कावासाकी निंजा झेडएक्स 10 आर ही गाडी खरेदी केली. एवढयावरच न थांबता त्याने या गाडीची ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक सुद्धा काढली. या गाडीची किंमत सुद्धा एक दोन लाख नसून ऍक्सेसरीज धरून तब्बल 21 लाख रुपये इतकी आहे. पश्चिम महाराष्ट्रात पहिलीच गाडी असल्याने त्याने सुद्धा याचे जंगी स्वागत केले.
शेअर मार्केटिंग व्यवसाय : राजेश चौगले हा शेअर मार्केटिंग चा व्यवसाय करतो. त्याला गाड्यांची प्रचंड आवड आहे. त्याच्याकडे याआधी सुद्धा बुलेट तसेच इतर स्पोर्ट्स बाईक आणि कार आहे. मात्र यावर्षी त्याने तब्बल 21 लाखांची कावासाकी निंजा झेडएक्स 10 आर गाडी घ्यायचे ठरवले आणि या दिवाळीत खरेदी केली. या गाडीची आणि तिचे जोरदार पद्धतीने केलेल्या स्वागताची कोल्हापूरात जोरदार चर्चा सुरू आहे.