ETV Bharat / state

कोल्हापूरमध्ये आणखी दोघे कोरोनामुक्त; रात्रीपासून एकही नवा रुग्ण नाही

कोल्हापूर जिल्ह्यात आज(सोमवारी) सकाळी दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 631 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 81 अ‌ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

kolhapur corona update
कोल्हापूर कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 15, 2020, 12:09 PM IST

कोल्हापूर- जिल्ह्यात आजपर्यंत 720 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 631 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत प्राप्त 92 अहवालांपैकी सर्वच अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर दोन जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 81 झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली. दरम्यान, रात्रीपासून एकही नवीन रुग्ण जिल्ह्यात आढळला नाही, हे चित्र दिलासादायक आहे.

आज सकाळपर्यंत तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. आजरा- 74, भुदरगड- 71, चंदगड- 75, गडहिंग्लज- 81, गगनबावडा- 6, हातकणंगले- 10, कागल- 57, करवीर- 21, पन्हाळा- 27, राधानगरी- 66, शाहुवाडी- 179, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-27 असे एकूण 712 आणि पुणे -1, सोलापूर-3, मुंबई-1, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 8, असे मिळून एकूण 720 रुग्णांची संख्या कोल्हापूर जिल्ह्यात आहे.

जिल्ह्यातील एकूण 720 रूग्णांपैकी 631 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे, आजपर्यंत उपचारार्थ दाखल असलेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 81 इतकी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.