कोल्हापूर - जिल्ह्यात आजअखेर 728 रूग्णांपैकी 665 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज एकूण 108 प्राप्त अहवालांपैकी 106 अहवाल निगेटिव्ह तर 2 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. शिवाय एका रुग्णाला डिस्चार्ज दिल्याने जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण 55 पॉझिटिव्ह रुग्ण उरले असून आतापर्यंत तर एकूण 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली. आज प्राप्त झालेल्या 2 पॉझिटिव्ह अहवालांमध्ये हातकणंगले तालुक्यातील 1 आणि राधानगरी तालुक्यातील 1 अशा दोन रुग्णांचा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या -
आजरा- 76, भुदरगड- 71, चंदगड- 75, गडहिंग्लज- 84, गगनबावडा- 6, हातकणंगले- 11, कागल- 57, करवीर- 21, पन्हाळा- 27, राधानगरी- 67, शाहुवाडी- 180, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-27 असे एकूण 720 आणि पुणे -1, सोलापूर-3, मुंबई-1, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 8 असे मिळून एकूण 728 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.