कोल्हापूर - जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफी मुद्द्यावरून मंत्री आणि भाजप नेते आमने-सामने आले आहेत. कोणत्याही विषयावर मोर्चा काढण्याआधी आमच्याशी समस्येवर चर्चा करा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले होते. तर चर्चेला बोलावल्यास आम्ही जाण्यास तयार असल्याचे भाजप नेते हळवणकर यांनी म्हटले. मात्र, चर्चेचा निरोप दिला तरीही अद्याप त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद आला नसल्याचे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.
यावर भाजपला आंदोलनांची सवय व्हायला पाहिजे असा खोचक टोला सुद्धा, मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. दरम्यान, शेतकरी कर्जमाफीतील त्रुटी विरोधात येत्या 28 जानेवारीला भाजपसह विरोधी पक्ष कोल्हापूरमध्ये मोर्चा काढणार आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष समरजीतराजे घाटगे यांनी याबाबत माहिती दिली. तसेच हजारोंच्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - राज्यभर 'वंचित'च्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद; कुठे दगडफेक, तर कुठे रास्ता रोको