कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर येत ( CM Ekanath Shinde On Kolhapur ) आहेत. कोल्हापूरातील विविध कार्यक्रमानांना ते हजेरी लावणार आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील पंचगंगा नदी घाट येथे आयोजित कार्यक्रमाच्या मार्गावर रस्त्याची डागडुजी करण्याचे काम सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी डागडुजी - मुख्यमंत्री पोहोचायला 10 मिनिटे राहिली असताना त्याच्या आधी रस्त्याची डागडुजी करण्याचा काम सुरू असल्याचे पाहायला मिळाले. येथील नर्सरी बाग येथील मुख्य मार्गावर चार वाजण्याच्या सुमारास डागडुजी सुरू असून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न पालिकेकडून सुरू होता.
असा असेल दौरा - मुख्यमंत्री कराडहून कोल्हापूरमध्ये पोहोचतील. पंचगंगा घाटावर आयोजित कणेरी मठावरील सुमंगलम या आंतरराष्ट्रीय सोहळ्याच्या बोधचिन्ह अनावरण कार्यक्रमाला उपस्थित राहतील. सायंकाळी 6 वाजता हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पाच्या उद्घाटनाला उपस्थित राहतील. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत जयसिंगपुरात शेतकरी मेळावा होईल. आणि जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.