ETV Bharat / state

CM Eknath Shinde in Kolhapur: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर; कणेरी मठाला देणार भेट - आज मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर

आज मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने दिनांक 20 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत कणेरी मठ येथे सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या ठिकाणी आज भेट देणार आहेत.

kaneri math visit story
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Feb 11, 2023, 9:13 AM IST

कोल्हापूर: शनिवार 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.00 वाजता कोल्हापूर विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे. पुढे ते कणेरी मठाकडे जाणार आहेत. शिवाय इथल्या तायरीबाबत आढावा घेणार आहेत. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सुद्धा कणेरी मठावर दिनांक 20 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या सुमंगलम पंचमहाभूत महोत्सवाला भेट देऊन येथे सुरु असलेल्या अनुषंगिक कामकाजाची माहिती घेऊन पाहणी केली.

विभागीय आयुक्तांची भेट: या महोत्सवात जल, अग्नी, वायू, पृथ्वी व आकाश या तत्वाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या डोमची पाहणी करुन श्री. काडसिद्धेश्वर स्वामी यांच्याकडून माहिती घेतली. तसेच हा उत्सव आयोजनाचा उद्देश व या कालावधीत आयोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमाची रुपरेषा राव यांनी जाणून घेतली. तसेच शासकीय यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या कामाचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.

परिसरात स्वच्छता ठेवावी: विभागीय आयुक्त श्री. राव पुढे म्हणाले की, सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाच्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांना जबाबदारी देण्यात आली होती. त्यातील बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत, उर्वरित सर्व कामे 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत पूर्ण करण्याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने महोत्सव परिसरात येणाऱ्या भाविकांना सुरळीतपणे पाणीपुरवठा व्हावा यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, असे त्यांनी सूचित केले. या महोत्सवाच्या अनुषंगाने कणेरी मठ परिसरात स्वच्छता अत्यंत दर्जेदार ठेवावी. शौचालये व स्वच्छतागृहाची व्यवस्था करुन, ती दिवसातून वेळोवेळी साफसफाई करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करावे. या महोत्सवात मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी होणार असल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाने दक्ष राहावे.

भारतातील पहिलाच मठ: पोलीस विभागाने वाहतूक व्यवस्था व सुरक्षा व्यवस्था बिनचूक ठेवावी, असे निर्देश विभागीय आयुक्त राव यांनी दिले. श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानने पर्यावरण जनजागृतीचे फार मोठे काम हाती घेतले. या कामातून त्यांची समाजाविषयी असलेली बांधिलकी दिसून येते. तसेच याप्रकारे पर्यावरण संवर्धनाचा जागर करणारा कदाचित हा मठ भारतातील पहिलाच मठ असावा. शासकीय यंत्रणांसाठीही पंचमहाभूत महोत्सव एक अनोखा कार्यक्रम आहे व त्यात सक्रिय सहभाग देऊन सांघिकपणे काम करुन महोत्सव यशस्वी करावा, असे आवाहनही राव यांनी केले.

हेही वाचा: PM Modi Mumbai Visit पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले भारतीय रेल्वेचे कौतुक म्हणाले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.