कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आज दिवसभरात 93 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, एकाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 62 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात 743 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 51 हजार 806 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर यातील 49 हजार 297 जणांनी कोरोनावर मात केली असून, 1 हजार 766 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 743 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे
1 वर्षाखालील - 60 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 1930 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 3616 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 27504 रुग्ण
51 ते 70 वर्ष -14908 रुग्ण
71 वर्षांवरील - 3788 रुग्ण
एकूण संख्या - 51 हजार 806
तालुक्यानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे
1) आजरा - 910
2) भुदरगड - 1261
3) चंदगड - 1235
4) गडहिंग्लज - 1551
5) गगनबावडा - 155
6) हातकणंगले - 5407
7) कागल - 1702
8) करवीर - 5871
9) पन्हाळा - 1893
10) राधानगरी - 1268
11) शाहूवाडी - 1374
12) शिरोळ - 2527
13) नगरपालिका कार्यक्षेत्रातील - 7701
14) कोल्हापूर महानगरपालिका - 16329
15) इतर जिल्ह्यातील, राज्यातील - 2622
हेही वाचा - ...तर शरद पवार हे बाळासाहेब यांच्या स्मारकाच्या जागेवर राष्ट्रवादीचे कार्यालय उभारतील - निलेश राणे