कोल्हापूर - कोल्हापुरात पंचगंगा नदीला आलेल्या नव्या पाण्याची पूजा करण्याची अनोखी परंपरा मागील अनेक वर्षापासून सुरू आहे. दरम्यान, आज शहरातील नागरीक आणि पेठातील तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वाजत-गाजत आणि वाद्याच्या गजरात नव्या पाण्याचे स्वागत केले.
कोल्हापुरात आजच्या दिवशी त्र्यंबोली देवीची यात्रा असते. या दिवशी पंचगंगा नदीला आलेल्या नव्या पाण्याची पूजा करून त्यानंतर हे पाणी देवीला आणि घरातील देवांना वाहिले जाते. मागील अनेक वर्षांपासून कोल्हापूरकरांची ही परंपरा अखंडितपणे सुरु आहे.
तर आज सकाळपासूनच शहरातील नागरीक आणि पेठांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने पंचगंगा नदीतील नव्या पाण्याची पूजा केली. त्यानंतर हे पाणी आपापल्या घरी नेऊन देवांना वाहिले.