कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ( Kolhapur District ) कोरोनाचा ( Corona ) प्रादुर्भाव आता पूर्णपणे कमी झाला असून जिल्ह्यात केवळ 19 रुग्ण उरले आहेत. विशेष म्हणजे या 19 रुग्णांमधील एकही रुग्ण रुग्णालयात उपचार घेत नसून ते घरातूनच उपचार घेत आहेत. कोरोना काळातील ही पहिलीच वेळ म्हणावी लागेल ज्या दिवशी रुग्णालयात कोरोना रुग्ण नाहीये. जिल्हा शल्य चिकित्सक अनिल माळी यांनी दिलेल्या आकडेवारीवरून जिल्ह्यातल्या कोणत्याच रुग्णालयात मंगळवारी रात्रीपर्यंत रुग्ण नाही, अशी नोंद झाली आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभरात 5 नवे रुग्ण आढळले असून 3 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 13 मार्च रोजी सुद्धा जिल्ह्यात एकही रुग्ण रुग्णालयात उपचार घेत नव्हता अशी नोंद आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 20 हजार 316 वर पोहोचली आहे. त्यातील 2 लाख 14 हजार 386 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या केवळ 19 वर आली असून एकूण मृतांची संख्या 5 हजार 911 झाली आहे.
मृतांच्या आकडेवारीवर एक नजर
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यापासून १५ मार्चपर्यंत एकूण 2 लाख 20 हजार 316 नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील 5 हजार 911 जणांचा मृत्यू आला आहे. यामध्ये विशेष म्हणजे 618 जण कोल्हापूर जिल्ह्याबाहेरचे आहेत.
कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्र - 1296 जणांचा मृत्यू
ग्रामीण भागातील 3150 जणांचा मृत्यू, आकडेवारी पुढीलप्रमाणे :
नगरपालिका भागातील 847 जणांचा मृत्य
जिल्हयाबाहेरील - 618 मृत
- वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे
- 1 वर्षाखालील - 358 रुग्ण
- 1 ते 10 वर्ष - 7945 रुग्ण
- 11 ते 20 वर्ष - 18505 रुग्ण
- 21 ते 50 वर्ष - 126537 रुग्ण
- 51 ते 70 वर्ष - 52925 रुग्ण
- 71 वर्षांवरील - 14046 रुग्ण
जिल्ह्यात असे एकूण 2 लाख 20 हजार 316 रुग्ण झाले आहेत.
हेही वाचा : Kolhapur To Tirupati Daily Flight : आनंदाची बातमी.. 27 मार्चपासून सातही दिवस कोल्हापूर ते तिरुपती विमानसेवा