ETV Bharat / state

नव्या स्मशानभूमीत कोणीच अंत्यसंस्कार करत नसल्याने गावकऱ्यांनी लढवली 'ही' शक्कल - etv bharat live

कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात स्मशानभूमीत कोणी अंत्यसंस्कार करत नसल्याने नांदगाव ग्रामपंचायतीने एक शक्कल लढवत थेट बक्षीस जाहीर करून टाकले आहे. गावात एखादी व्यक्ती मयत झाल्यास त्या व्यक्तीचे प्रथम नव्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करेल त्याच्या नातेवाईकाला ग्रामपंचायतीकडून दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तर, मयत झालेल्या नातेवाईकांचे मन परिवर्तन करणाऱ्या व्यक्तीला देखील तीन हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, नेमके हे प्रकरण काय आहे याबाबात ईटीव्ही भारतने आढावा घेतला आहे.

गावकऱ्यांची बैठक
गावकऱ्यांची बैठक
author img

By

Published : Oct 27, 2021, 8:53 AM IST

Updated : Oct 27, 2021, 9:44 AM IST

कोल्हापूर - गावाच्या नव्या स्मशानभूमीत जो कोण मयत झालेल्या व्यक्तीचे प्रथम अंत्यसंस्कार करेल त्याच्या नातेवाईकांना रोख दहा हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. शिवाय नातेवाइकांचे मन परिवर्तन करणाऱ्या व्यक्तीला तीन हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. हे ऐकून तुम्हाला नवल वाटेल. पण हे सत्य आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील नांदगाव हे गाव यासाठी चर्चेत आले आहे. कारण अंधश्रद्धेपोटी गावातील नव्या स्मशानभूमी ऐवजी जुन्या स्मशानभूमीच्या बाजुलाच अंत्यसंस्कार केला जातो. त्यामुळे हैराण झालेल्या ग्रामपंचायत प्रशासनाने नव्या स्मशानभूमीत प्रथम अंत्यसंस्कार करणाऱ्या नातेवाईकांना बक्षीस जाहीर केले आहे. दरम्यान, नेमके हे प्रकरण काय आहे याबाबात ईटीव्ही भारतने आढावा घेतला आहे.

माहिती देताना गावकरी

पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर स्मशानभूमी पाण्याखाली जाते

कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम अशा शाहूवाडी तालुक्यातील पन्हाळा यांच्या सरहद्दीवर असणाऱ्या नांदगाव हे गाव जवळपास बावीस हजार लोकवस्तीचे आहे. गावाच्या जवळूनच मणिकर्णिका नदी वाहते. याच नदीच्या काठावर जुनी स्मशानभूमी आहे. गावातील व्यक्ती मयत झाल्यानंतर यापूर्वी नदीकाठी असणाऱ्या स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जायचे. सध्या ही स्मशानभूमी मोडकळीला आली आहे. तर पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर स्मशानभूमी पाण्याखाली जाते. त्यावेळी अंत्यसंस्कार कुठे करायचे? असा प्रश्न समोर आला. त्यावर उपाय म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने गावाच्या पश्चिमेला असणार्‍या माळावर स्मशानभूमी नव्याने उभा केली. याला पाच वर्ष झाले. मात्र, या स्मशानभूमीत आजवर एकही अंत्यसंस्कार झालेले नाहीत.

ग्रामस्थ जुन्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करतात

या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले तर घरातील व्यक्तींच्या वाईट होईल किंवा मागे इडापिडा लागेल. अशी ग्रामस्थांची समजूत आहे. त्यामुळे ग्रामस्थ जुन्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करतात. मात्र, जुनी स्मशानभूमी ही मोडकळीला आली आहे. त्यामुळे त्याच परिसरात अंत्यसंस्कार केले जात आहेत. शेजारी असणाऱ्या शेतवाडी तर कुणाच्या बांधावर अंत्यसंस्कार केल्यामुळे प्रचंड प्रदूषण होत आहे. गावात जनजागृती करून देखील नव्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करायला कोणीच पुढाकार घेत नाही.

अंधश्रद्धेपोटी गावातील ग्रामस्थ नव्या स्मशानभूमीत मयताचे अंत्यसंस्कार करत नाहीत

या स्मशानभूमीत कोणी अंत्यसंस्कार करत नसल्याने नांदगाव ग्रामपंचायतीने एक शक्कल लढवत थेट बक्षीस जाहीर करून टाकले आहे. गावात एखादी व्यक्ती मयत झाल्यास त्या व्यक्तीचे प्रथम नव्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करेल त्याच्या नातेवाईकाला ग्रामपंचायतीकडून दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तर, मयत झालेल्या नातेवाईकांचे मन परिवर्तन करणाऱ्या व्यक्तीला देखील तीन हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, नव्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात यावेत, यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, अंधश्रद्धेपोटी गावातील ग्रामस्थ नव्या स्मशानभूमीत मयताचे अंत्यसंस्कार करत नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. गावातील जाणते लोक या निर्णयाचे स्वागत करत आहेत.

हेही वाचा - राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड.. वेतनासाठी 112 कोटींचा मिळणार निधी

Last Updated : Oct 27, 2021, 9:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.